यासाठी काही स्वादिष्ट आणि पौष्टिक आरोग्य पदार्थांचे पर्याय आहेत. मधुमेही रुग्णांसाठी हे पर्याय सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतात. घरात अनेक पदार्थ उपलब्ध असतात, काही पटकन तयार करता येतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण मधुमेह असलेल्यांसाठी भूक ताणणं योग्य नाही.
Kidneys : निरोगी किडन्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला, काही पदार्थांना करा बाय बाय
advertisement
मधुमेह असल्यास काय खावं ?
भाजलेले चणे: भाजलेले चणे हा एक स्वस्त पर्याय आहे. प्रथिनं आणि फायबर असलेला हा पौष्टिक नाश्ता आहे. यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. यामुळे रक्तातील साखरेची वाढ रोखू शकते. भाजलेले चणे नियमित खाल्ल्यानं मधुमेहींना संतुलित ऊर्जा संतुलन राखण्यास देखील मदत होऊ शकते.
ओट्स: ओट्समधे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढत नाही. मधुमेही रुग्णांसाठी ओट्स फायदेशीर ठरतात.
Women Health : योग्य आहार, नियमित तपासणी, स्त्रियांसाठी खास हेल्थ - डाएट टिप्स
जवस : मधुमेही रुग्णांसाठी जवस खाणं फायदेशीर आहे. जवसाच्या बियांमधे ओमेगा फॅटी एसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी जवस उपयुक्त आहे.
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे उपयुक्त ठरु शकतात.
बदाम: बदामांमधे विविध प्रकारचे पोषक घटक असतात. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही याची मदत होते.