TRENDING:

Food for Heart : हृदयासाठीचा आहार महत्त्वाचा, या पाच गोष्टी करतील हृदय मजबूत

Last Updated:

तुम्हाला किंवा कुटुंबात कोणाला हृदयविकार असेल तर पाच पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं हृदय मजबूत होईल आणि तंदुरुस्त राहील. हृदयाचं आरोग्य ताटापासून सुरू होतं. आपल्या ताटात योग्य अन्न असेल तरच आपलं हृदय निरोगी राहू शकतं. योग्य अन्न, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हृदयविकार आणि हृदयाशी संबंधित शारीरिक समस्यांचं प्रमाण वाढतंय. अशावेळी आपण काय खातो यावर आपली प्रकृती अवलंबून असते हे समजून आहार करणं आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

तुम्हाला किंवा कुटुंबात कोणाला हृदयविकार असेल तर पाच पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं हृदय मजबूत होईल आणि तंदुरुस्त राहील. हृदयाचं आरोग्य ताटापासून सुरू होतं. आपल्या ताटात योग्य अन्न असेल तरच आपलं हृदय निरोगी राहू शकतं. योग्य अन्न, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

advertisement

Cloves : लवंगांचं पाणी करेल जादू, लपलेले आजार होतील छूमंतर, वाचा सविस्तर

फळं - ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळांमधे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

धान्य - दलिया, ओट्स यासारखं संपूर्ण धान्य हृदयासाठी खूप चांगलं आहे. रक्तदाब नियंत्रण आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. पांढरे तांदूळ आणि रिफाइंड पीठाऐवजी याचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

advertisement

सुका मेवा - अक्रोड, बदाम, चिया सीड्स आणि जवसाच्या बियांमधे निरोगी चरबी आणि फायबर असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी उपयोग होतो.

Compress : हॉट वॉटर बॅग किंवा आईसबॅग कधी वापरावी ? या टिप्सचा होईल उपयोग

तेल - एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये हृदयासाठी निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते इन्सुलिनसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहेत.

advertisement

मासे - सॅल्मन, मॅकरेल, ट्राउट आणि सार्डिन सारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतात. यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी, सूज कमी करणं आणि हृदयाचे ठोके सामान्य करण्यासाठी मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

भाज्या - पालक, केल आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमधे जीवनसत्त्वं, खनिजं आणि नायट्रेट्स भरपूर असतात. यामुळे रक्तदाब कमी करणं आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होतो. दररोज खाण्यासाठी सॅलड, सूप किंवा स्मूदीमधे याचा वापर करावा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food for Heart : हृदयासाठीचा आहार महत्त्वाचा, या पाच गोष्टी करतील हृदय मजबूत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल