TRENDING:

दिवाळीसाठी 5 मिनिटांत काढा संस्कार भारती रांगोळी; स्पेशल टिप्स Video

Last Updated:

दिवाळीसाठी घरोघरी अंगणात सुंदर रांगोळी रेखाटल्या जातात. 5 मिनिटांत संस्कार भारती रांगोळी कशी काढायची पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, 8 नोव्हेंबर: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत नवीन कपडे, फटाके, फराळ, रोषणाई असा सगळा उत्साह असतो. यासोबतच दिवाळीसाठी घरोघरी अंगणात सुंदर रांगोळी रेखाटल्या जातात. या रांगोळीला विशेष महत्त्व असते. घरातील आनंद, सकारात्मकता आणि चैतन्य रांगोळीच दर्शवते. परंतु अचानक काही सुचत नसल्यामुळे मग तेच नेहमीचे पावलांचे ठसे किंवा ठिपक्यांच्या रांगोळ्यांचे पर्याय समोर येतात. त्यामुळे दिवाळीसाठी 5 मिनिटांत संस्कार भारती रांगोळी कशी काढायची याची माहिती ठाणे येथील कला शिक्षिका स्वाती गद्रे यांनी सांगितली आहे.
advertisement

ठाण्याच्या कळवा परिसरात स्थित असलेल्या कला शिक्षिका स्वाती गद्रे या रांगोळी कलाकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विविध प्रकारच्या रांगोळी काढतात. स्वाती या चित्रकला आणि रांगोळीच्या शिक्षिका असून लहान मुलांना त्या चित्रकला करणे रांगोळी काढणे शिकवतात. रांगोळीची अत्यंत आवड असल्यामुळे अनेक रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन त्या विजेता देखील झाल्या आहेत. पोट्रेट रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी त्या सर्रास 2 ते 5 मिनिटांत तयार करतात, अशी माहिती कला शिक्षिका स्वाती गद्रे यांनी दिली आहे.

advertisement

फक्त चाळणीचा वापर करून काढा आकर्षक रांगोळी, पाहा दिवाळी स्पेशल टिप्स

अशी काढा संस्कार भारती रांगोळी? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुठे तरी सुरुवात करावी लागते! रस्त्यावर उभं राहून प्रोडक्ट विकले, आता वर्षाला 20 कोटींचा बिझनेस! Video
सर्व पहा

संस्कार भरती रांगोळी काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. रांगोळी काढण्यापूर्वी तीन वेगवेगळ्या आकाराचे मोठे गोल आकार चॉकच्या सहाय्याने रेखाटून घ्यावे. सर्वप्रथम एक लहान गोल, त्यावर थोडी मोठी गोल रिंग. या दोन गोलाकारावर शेवटी मोठी एक गोलाकार रिंग काढून घ्यावी. आपल्या आवडीचा रंग निवडून प्रथम लहान गोल आकारात एक रंग भरून घ्यावा. दुसऱ्या रिंगेत वेगळा रंग भरावा. रांगोळीचा रंगांवर रेखाटलेली नक्षी अधिक शोभून दिसावी यासाठी पांढऱ्या रंगाची रांगोळी वापरावी. एक लहान नक्षी पूर्ण गोलात सलग काढावी. रांगोळीच्या मध्यास स्वस्तिक, गाईची पावले किंवा देवीचे पावले असे काढावेत. अशा प्रकारे अवघ्या 5 मिनिटांत संस्कार भारती रांगोळी तयार होते, अशी माहिती स्वाती गद्रे यांनी दिली. 

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळीसाठी 5 मिनिटांत काढा संस्कार भारती रांगोळी; स्पेशल टिप्स Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल