शरीराला उन्हाळ्यात जितकं पाणी लागतं तितकंच हिवाळ्यातही आवश्यक असतं. उन्हाळ्यामुळे घाम वाढतो आणि त्यामुळे तहान वाढते, पाणी प्यायलं जातं. याबाबत भारतात सर्वेक्षण करण्यात आलं. अंदाजे 75% भारतीय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डिहायड्रेशननं ग्रस्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलं. जाणून घेऊया पाणी कमी पिणं शरीराला कसं धोकादायक ठरतं.
Diabetes : न्याहारीतले हे पदार्थ वाढवतात रक्तातली साखर, या पदार्थांना ढकला दूर
advertisement
हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यानं रक्त जाड होऊ शकतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तसंच बद्धकोष्ठता, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणं आणि त्वचा कोरडी होणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
2025 च्या डिहायड्रेशन स्टॅटिस्टिक्स रिपोर्टनुसार, जगभरातील अंदाजे 16-21% जणांना दररोज डिहायड्रेशनचा त्रास होतो. कमी पाणी पिण्याचे शरीरावर खोलवर परिणाम होत असतात.
Papaya : बहुगुणी आणि आरोग्यवर्धक पपई, पपई खा, तंदुरुस्त राहा
थंड हवामानात तहान लागण्याचं प्रमाण कमी होतं. घाम येण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची गरज नेहमीइतकी जाणवत नाही.
हिवाळ्यात, मूत्रपिंड मूत्राद्वारे जास्त पाणी बाहेर टाकतात. याव्यतिरिक्त, घरांमधे आणि कार्यालयांमधे हीटर, ड्रायर आणि घरातील हीटिंग सिस्टममुळे हवा खूप कोरडी होते. त्याचाही परिणाम जाणवतो. त्यामुळे घरी, बाहेर, कार्यालयांत पाणी प्यायला विसरु नका.
