Diabetes : न्याहारीतले काही पदार्थ देतात मधुमेहाला आमंत्रण, तुम्हीही चुकत असाल तर आजच व्हा सावध

Last Updated:

उच्च म्हणजेच High कोलेस्ट्रॉल हा एक हळूहळू पसरणारा आजार आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. नाश्त्याच्या सवयींबद्दल काळजी घेतली नाही, तर नकळतपणे तुम्ही मधुमेहाला आमंत्रण देत असता.

News18
News18
मुंबई : नाश्ता म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला पोटात जाणारं पहिलं अन्न. न्याहारी आणि मधुमेहात जवळचा संबंध आहे. अनेकदा, नाश्त्यातील काही आवडते पदार्थ शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' (LDL) वाढवू शकतात.
उच्च म्हणजेच High कोलेस्ट्रॉल हा एक हळूहळू पसरणारा आजार आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. नाश्त्याच्या सवयींबद्दल काळजी घेतली नाही, तर नकळतपणे तुम्ही मधुमेहाला आमंत्रण देत असता.
साखरयुक्त अन्न - सकाळी दुधासोबत साखरयुक्त पदार्थ खाणं हा अनेकांचा दिनक्रम असतो. पण जाहिरातींमधे हेल्दी दाखवलेल्या पदार्थात अनेकदा साखरेचं प्रमाण जास्त, रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचं प्रमाण कमी असतं.
advertisement
या पदार्थांमुळे यकृतातील ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवतात. याऐवजी, नाश्त्यात ओट्स, दलिया किंवा धान्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या.
बेकरी उत्पादनं - सकाळच्या चहासोबत पेस्ट्री, कुकीज, डोनट्स किंवा गोड मफिन्स चविष्ट वाटतील, पण त्यात ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. या चरबीमुळे, कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे धमन्या कडक होऊ शकतात, हृदयरोगाचा धोका देखील वाढतो.
advertisement
तळलेले पदार्थ - अनेक घरांमधे नाश्त्यासाठी समोसे, कचोरी, पुरी किंवा पराठे बनवले जातात. हे पदार्थ चविष्ट असले तरी, त्यात तेल आणि अनहेल्दी फॅटसचं प्रमाण जास्त असतं. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वेगानं वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात.
advertisement
Full fat dairy products - दूध, चीज आणि दही हे आरोग्यदायी आहेत असा समज असला तरी, फुल-फॅट म्हणजेच क्रीमी उत्पादनं खात असाल तर ते कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं नाही. त्यामध्ये संतृप्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्याऐवजी कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड दूध, दही आणि चीज वापरू शकता.
पांढरा ब्रेड - सकाळी टोस्ट किंवा सँडविचच्या स्वरूपात पांढरा ब्रेड खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पांढरा ब्रेड रिफाइंड पिठापासून बनवला जातो. यात फायबरचं प्रमाण खूप कमी असतं. रिफाइंड कार्बोहायड्रेट असल्यानं  शरीरात साखरेची पातळी वेगानं वाढते आणि अप्रत्यक्षपणे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्याऐवजी, मल्टीग्रेन किंवा होल-व्हीट ब्रेड निवडू शकता.
advertisement
मधुमेह असेल तर आहारात कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : न्याहारीतले काही पदार्थ देतात मधुमेहाला आमंत्रण, तुम्हीही चुकत असाल तर आजच व्हा सावध
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement