साखर आणि कॅलरींचा भार: दूध आणि साखरेचा चहा म्हणजे कॅलरी आणि साखरेचा अतिरिक्त स्रोत. जास्त साखरेमुळे लिव्हरवर चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे 'नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज' (NAFLD) चा धोका वाढतो.
ऍसिडिटी आणि जळजळ: चहामध्ये 'टॅनिन' नावाचे संयुगे असतात. कडक किंवा रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटात ऍसिडिटी वाढते आणि छातीत जळजळ (Heartburn) होते. ही ऍसिडिटी हळूहळू आतड्यांना आणि लिव्हरच्या कार्याला बाधित करते.
advertisement
पचन बिघडणे: टॅनिन हे प्रथिनं आणि कर्बोदकांना बांधून ठेवतात, ज्यामुळे पचनाची प्रक्रिया मंदावते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे लिव्हरवर होतो.
लिव्हरवर विषारी पदार्थांचा भार: काही अभ्यासानुसार, अति प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन केल्यास लिव्हरमधील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे लिव्हरला सूज येण्याचा धोका असतो.
चहासोबतचे स्नॅक्स: अनेकजण चहासोबत तळलेले, तेलकट किंवा पॅकबंद स्नॅक्स खातात. हे पदार्थ सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटने समृद्ध असल्याने लिव्हरला त्यांना पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि फॅटी लिव्हरची समस्या गंभीर होते.
लोहाचे शोषण कमी: चहामध्ये असलेले टॅनिन शरीरात लोहाचे शोषण होण्यात अडथळा निर्माण करतात. लोहाची कमतरता झाल्यास एकंदरीत आरोग्य आणि लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
