TRENDING:

Post Diwali Diet Tips : दिवाळीच्या सुट्टीत वजन वाढलं, या पेयांनी करा वजन कमी..

Last Updated:

फराळ खाऊन तुमचंही वजन वाढलं असेल तर घरीच काही पेयं तयार करुन प्या. हळूहळू वजन कमी होण्यास मदत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई - दिवाळी संपली असली तरी अजूनही अनेकांच्या सुट्ट्या सुरु आहेत. सुट्ट्या संपल्या की शाळा, ऑफिस
News18
News18
advertisement

सुरु होणार. सुट्ट्या म्हटल्या की निवांतपणा आला, नेहमीपेक्षा जास्त खाणं पिणं वाढलं की शरीराचंही वजन वाढतं. त्यामुळे तुम्ही जर सणासुदीत भरपूर गोड खाल्लं असेल आणि तुमचं वजन वाढलं असेल तर या पेयांनी वजन कमी करा. यामुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थही बाहेर काढले जाऊ शकतात.

या पेयांमुळे, शरीर योग्य प्रमाणात हायड्रेटेड राहतं आणि शरीरात जमा झालेले सर्व टॉक्सिन्स देखील

advertisement

मल आणि लघवीच्या मदतीनं बाहेर जातील. ही सर्व पेये घरी सहज तयार करता येतात. पाहूया ते बनवण्याची पद्धत आणि फायदे...

Hair Colour Tips - केस अकाली पांढरे होतायत ? आहारात बदल करा...आणि फरक बघा

चरबी कमी करण्यासाठी कोणतं पेय सर्वोत्तम ?

1. लिंबू पाणी: अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध एका ग्लास पाण्यात मिसळा. ते सकाळी रिकाम्या पोटी प्या.

advertisement

फायदा: यामुळे चयापचय वाढतं आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये याचा उपयोग होतो.

2. आलं आणि लिंबू पाणी : आल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाका, 5-10 मिनिटं उकळा आणि लिंबाचा रस घाला. हे पाणी प्या.

फायदा: यामुळे पचन सुधारतं आणि भूक कमी होते.

Health Tips : चंदनापासून हळदीपर्यंत... थंडीच्या दिवसांत त्वचेच्या काळजीसाठी करा 'हे' घरगुती उपाय

advertisement

3. पुदिन्याचा चहा: पुदिन्याची पानं उकळत्या पाण्यात घाला, 5-7 मिनिटं राहू द्या नंतर गाळून हे पाणी प्या.

फायदा : यामुळे पचनास मदत करते आणि शरीर थंड राहतं.

4. फळांचं पाणी: एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काकडी, लिंबू, संत्री किंवा आलं घाला. काही वेळ हे पाणी

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

फायदा: यामुळे हायड्रेशन वाढतं आणि शरीराला डिटॉक्सिफाय करता येतं.

advertisement

5. ग्रीन टी: ग्रीन टी बॅग एक कप गरम पाण्यात घाला आणि 3-5 मिनिटे राहू द्या, मग प्या.

फायदा: यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि यामुळे चयापचय वाढतं.

6. ऍपल सायडर व्हिनेगर पेय: एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा.

फायदा: यामुळे भूक कमी होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Post Diwali Diet Tips : दिवाळीच्या सुट्टीत वजन वाढलं, या पेयांनी करा वजन कमी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल