लग्न आणि कॅन्सरचा संबंध असू शकतो, याचा विचार कधीच कुणी केला नसेल. त्यामुळे एका डॉक्टरने कॅन्सर टाळण्यासाठी लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण लग्न आणि ब्रेस्ट कॅन्सरचा कसा संबंध आहे हे या डॉक्टरने स्पष्ट करून सांगितलं आहे.
Blood Pressure : BP चं औषध आयुष्यभरासाठी नाही; नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं कधी बंद करायचं
advertisement
सामान्यपणे कॅन्सर म्हटलं की जीवनशैली, आहाराशी जोडला जातो. पण ठाण्यातील डॉ. वाणी परमार म्हणाल्या, फक्त आहारच ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत नाही, तर लग्नाबाबतही विचार करायला हवा. आता महिला करिअरवर फोकस करतात, त्यामुळे त्या लवकर लग्न करत नाही, त्यांना लवकर मूल नको असतं. पण वयाच्या तिशीनंतर प्रेग्नन्सी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो.
याबाबत अभ्यासही करण्यात आला आहे. ज्या महिला एकोणिसाव्या वयात लग्न करतात, विशेषत: ग्रामीण भागात तुम्हाला हे पाहायला मिळेल. या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका बराच कमी होतो. ज्या महिला लवकर लग्न करतात, ज्यांना लवकर मुलं होतात, कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त एक वर्ष ब्रेस्टफिड करतात त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी दिसून आलं आहे, असं त्या म्हणाल्या.
सकाळी उठल्यावर ब्रश करू नका; पुण्याच्या डेंटिस्टचा अजब सल्ला, कारणही सांगितलंय
डॉ. वाणी परमार ब्रेस्ट ऑन्कोसर्जन आहेत. ठाण्यातील एका रुग्णालयात त्या कार्यरत आहेत. त्यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीतीत ही माहिती दिली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं
1) स्तन किंवा काखेत गाठ जाणवणे. यामुळे सहसा वेदना होत नाही. जरी सर्व गाठी कर्करोगाच्या नसतात, तरीही त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून ती कर्करोगाची आहे की नाही हे समजू शकेल.
2) स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल हे देखील एक लक्षण असू शकते.
3) याशिवाय, त्वचेची लालसरपणा, खळगे, स्तनाची त्वचा नारंगी सालीसारखी दिसणे ही स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
4) कधीकधी स्तनाचा कर्करोग झाल्यावर स्तनाग्रातून स्त्राव होतो. जर ताण येत असेल किंवा स्त्राव रक्त किंवा इतर कोणताही द्रव असेल, तर ती गंभीर बाब आहे.
5) जर स्तनातील वेदना दीर्घकाळ राहिल्या आणि त्या पाळीशी संबंधित नसेल, तर नक्कीच तपासणी करून घ्यावी. काखेतील लिम्फ नोड्स (lymph nodes) सुजणे किंवा मोठे होणे हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
