Blood Pressure : BP चं औषध आयुष्यभरासाठी नाही; नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं कधी बंद करायचं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Blood Pressure Medicine : नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं की, 'डॉक्टर बीपीचं औषध आयुष्यभर घ्यायचं का?' हा प्रश्न इतका सामान्य आहे की ओपीडीमध्ये दररोज साधारणत: 10 लोक तरी मला हा प्रश्न विचारतात.
नवी दिल्ली : अरे देवा! ब्लड प्रेशर... म्हणजे आता आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागणार तर... असा समजच आहे. खरंच बीपी वाढला की बीपीचं औषध कायमचं घ्यावं लागतं का? असा प्रश्न कित्येकांना पडतो. नाशिकच्या डॉक्टरांनी बहुतेकांच्या मनात असलेल्या या मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं की, "डॉक्टर बीपीचं औषध आयुष्यभर घ्यायचं का?' हा प्रश्न इतका सामान्य आहे की ओपीडीमध्ये दररोज साधारणत: 10 लोक तरी मला हा प्रश्न विचारतात. पण खरंतर एकदा बीपी वाढला की कायमचा बीपी वाढला असं नाही. काही वेळेस ताणतणाव, जादा मिठाचं सेवन,  झोप न लागणं यामुळे तात्पुरता बीपी वाढू शकतो. अशावेळी घाबरू नका, तपासणी करून घ्या. जर तीन वेगवेगळ्या मोजमापात बीपी जास्त दिसला मग त्याला हायपरटेन्शन म्हणतो"
advertisement
"आता प्रश्न असा की बीपी वाढला म्हणजे औषध आपल्याला आयुष्यभर घ्यावं लागतं का? तर उत्तर आहे नाही. जर तुम्ही वजन कमी केलं, आहारातलं मीठ कमी केलं, दररोज एक्सरसाइझ केली, ताणतणाव कमी केला तर बऱ्याच वेळा औषधं कमी करता येतात. कधीकधी पूर्णपणेही औषधं थांबवता येतात"
advertisement
"पण हे निर्णय स्वतः घेऊ नका, जर बीपी कमी झाला म्हणून अचानक तुम्ही गोळी कमी केली तर स्ट्रोक, पॅरालिसिस, हार्ट अटॅक, किडनीला डॅमेजसारखे मोठे धोके निर्माण होतात", असं डॉक्टरांनी सांगितलं.
अरे देवा! दातांना कॅप लावताना घशात गेली, पण दिसेना; अशा ठिकाणी अडकली की रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण
डॉक्टर म्हणाले, "बीपीची गोळी म्हणजे शिक्षा नाहीये ती एक संरक्षण आहे. ती तुमचं हृदय, मेंदू, किडनी याला सुरक्षित ठेवते. म्हणून औषध घेताय तर विश्वासाने घ्या. घाबरू नका, पण कारणे शोधा आणि जीवनशैली बदला. एक दिवस असा येईल की डॉक्टर स्वतः सांगतील की बीपीच्या गोळ्यांची तुम्हाला गरज नाही किंवा ती कमी करता येईल ब्लड प्रेशर वाढणं हा शेवच नाहीये, ही स्वतःची काळजी घेण्याची सुरुवात आहे"
advertisement
नाशिकचे डॉक्टर हिरालाल पवार यांनी इन्टाग्राम अकाऊंटवर याबाबत व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
सामान्य रक्तदाब किती असावा?
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, अमेरिकन हार्ट असोसिएशनने 5 प्रकारच्या रक्तदाबाची श्रेणी निश्चित केली आहे. यामध्ये सामान्य रक्तदाब श्रेणी, वाढलेली रक्तदाब श्रेणी, उच्च रक्तदाब स्टेज 1, हायपरटेन्शन स्टेज 2 आणि हायपरटेन्सिव्ह क्रायसिस सांगण्यात आले आहे.
advertisement
| सामान्य वय | उच्च | कमी | 
| नॉर्मल | 120 | 80 | 
| वाढलेले | 120-129 | 80 पेक्षा कमी | 
| हाय बीपी स्टेज 1 | 130-139 | 80-89 | 
| हाय बीपी स्टेज 2 | 140 पेक्षा जास्त | 90 पेक्षा जास्त | 
| हायपरटेंसिव क्राइसिस | 180 पेक्षा जास्त | 120 पेक्षा जास्त | 
advertisement
Location :
Delhi
First Published :
October 31, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blood Pressure : BP चं औषध आयुष्यभरासाठी नाही; नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं कधी बंद करायचं


