ब्लॅकहेड्समुळे त्वचेची चमक कमी होते, ब्लॅकहेड्स काढण्यासाठी, काही उपाय घरीही करुन बघा. यासाठी बेकिंग सोडा, टोमॅटो, वाफ घेणं यासारखे पर्याय आहेत. हे पर्याय सहज उपलब्ध होणारे आहेत आणि वापरायलाही सोपे आहेत.
Healthy Habits : मेंदूचं आरोग्य बिघडवणाऱ्या या सवयी बदला, गंभीर परिणाम रोखा
बेकिंग सोडा - हा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. हा घरगुती उपाय वापरण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडा दोन चमचे पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू द्या.
advertisement
नंतर, कोमट पाण्यानं धुवा. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील पीएच असंतुलन निष्क्रिय करतो आणि मृत त्वचा आणि घाण काढून टाकतो.
टोमॅटो - टोमॅटोमधे व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतं. तेलकट त्वचेसाठी टोमॅटो खूप फायदेशीर मानला जातो. या घरगुती उपायाचा वापर करण्यासाठी, टोमॅटोचे गोल तुकडे करा आणि ते त्वचेच्या ब्लॅकहेड्स असलेल्या भागांवर घासून घ्या. थोड्या वेळानं चेहरा धुवा.
Weight Loss : हेल्दी वेट लॉस म्हणजे काय ? व्यायाम, योग्य आहाराचं कनेक्शन काय ?
वाफ घेणं - ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घेणं हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. वाफेमुळे त्वचा स्वच्छ होते आणि बंद झालेली छिद्र उघडतात, ज्यामुळे घाण निघून जाते. वाफेमुळे ब्लॅकहेड्स मऊ होतात, ज्यामुळे ते त्वचेवरून सहजपणे निघून जातात.
मध - लिंबू - साखर - दोन चमचे मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साखर नीट मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर पंधरा मिनिटं लावा आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. लिंबूमधील सायट्रिक आम्ल छिद्रं उघडण्यास मदत करतं, तर मधात बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो आणि साखर स्क्रब म्हणून काम करतं.
