चेहऱ्यासाठी मुलतानी माती आणि गुलाबपाणी पॅक, टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक, कोरफड आणि काकडीचा हायड्रेटिंग फेस पॅक हे चांगले पर्याय आहेत.
मुलतानी माती नेहमीच आपल्या घरांमध्ये एक विश्वासार्ह स्किनकेअर साथीदार राहिली आहे. अतिरिक्त तेल शोषून घेण्याबरोबरच त्वचा थंड आणि फ्रेश बनवण्यासाठी उपयुक्त आहे. दोन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल घालून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटं तसंच ठेवा. नंतर थंड पाण्यानं धुवा. यामुळे चेहऱ्यावरची छिद्रं लगेचच घट्ट होतील.
advertisement
White Hair : केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण होईल कमी, हे बदल अवश्य करा
टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक - टोमॅटो हे एक नैसर्गिक अॅस्ट्रिंजंट आहे आणि लिंबूमधे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे दोन्ही मिळून निस्तेज आणि तेलकट त्वचेवर रामबाण उपाय आहे. यामुळे छिद्रांची समस्या लवकर दूर होऊ शकते. या फेसपॅकसाठी एक पिकलेला टोमॅटो कुस्करुन घ्या, त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर दहा-बारा मिनिटं लावा आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. त्वचा कोरडी होऊ नये म्हणून थोडं मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते आणि छिद्रं कमी होण्यास मदत होते.
बेसन-हळद आणि दह्याचा पॅक - बेसन, हळद आणि दह्याचं मिश्रण पिढ्यानपिढ्या वापरलं जातंय. छिद्रं घट्ट करण्याव्यतिरिक्त, यामुळे त्वचेला पोषण मिळतं. दोन चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि दोन चमचे दही मिसळून पेस्ट बनवा. ते पंधरा-वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा गुळगुळीत, घट्ट आणि नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटेड होते.
Sweating : दुर्गंधी घाम - शरीरातल्या बदलांचे संकेत, लक्षणं ओळखा - उपचार करा
ग्रीन टी आइस क्यूब्स - उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी ही ट्रिक फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि थंड राहते. ग्रीन टी बनवा, ती बर्फाच्या ट्रेमध्ये घाला आणि गोठवा. बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर हलक्या हातानं घासा. यामुळे त्वरित थंडावा मिळेल, छिद्रं घट्ट होतील आणि त्वचा फ्रेश वाटेल.
कोरफड आणि काकडीचा हायड्रेटिंग फेस पॅक - दोन चमचे काकडीचा रस आणि दोन चमचे कोरफड जेल मिसळा. याचा जाड थर लावा, वीस मिनिटं पॅक तसाच राहू द्या आणि थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचेवरील छिद्रं कमी होण्यास मदत होते.
यापैकी कोणताही फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.