White Hair : केस काळे करण्यासाठी महत्त्वाचे चार जिन्नस, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस एकदा पांढरे झाले की, ते पुन्हा पूर्णपणे काळे करणं कठीण असते. पण, योग्य आहार आणि पोषणानं ते पांढरे होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतं. आहारात काही गोष्टी नियमित खाल्ल्यानं केसांना पोषण मिळू शकतं आणि ते अकाली पांढरे होण्यापासून रोखता येतात.
मुंबई : सध्याच्या काळात कोणत्याही वयोगटात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय. रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर, अन्नात पोषक तत्वांचा अभाव, जास्त ताण घेणं, अपुरी झोप यासारखी अनेक कारणं असू शकतात.
केस एकदा पांढरे झाले की, ते पुन्हा पूर्णपणे काळे करणं कठीण असते. पण, योग्य आहार आणि पोषणानं ते पांढरे होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतं. आहारात काही गोष्टी नियमित खाल्ल्यानं केसांना पोषण मिळू शकतं आणि ते अकाली पांढरे होण्यापासून रोखता येतात.
आहारतज्ज्ञांच्या मते, तीळ, आवळा, मेथीचे दाणे आणि नारळ नियमित खाल्ल्यानं केस दीर्घकाळ काळे आणि दाट राहण्यास मदत होते.
advertisement
तीळ - तीळामधे कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असतं. त्यातले हेल्दी फॅटस् आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि टाळूला पोषण देतात. दररोज काळे तीळ खाल्ल्यानं केसांचा रंग टिकून राहण्यास मदत होते. आहारतज्ज्ञांव्यतिरिक्त, इतर अनेक अहवालांच्या निकालांवरून हे स्पष्ट झालं आहे.
advertisement
आवळा - आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे केसांत मेलेनिन वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक रंग मिळतो. आवळा खाल्ल्यानं केस मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. यासाठी आवळा कच्चा, आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा पावडरच्या स्वरूपात खाऊ शकता.
advertisement
मेथीच्या बियांमधे प्रथिनं आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस गळतीचं प्रमाण कमी होतं. दररोज सकाळी रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे खा, यामुळे केस पांढरे होण्याची समस्या देखील कमी होऊ शकते.
advertisement
नारळात हेल्दी फॅटसचा असतात. टाळू मॉइश्चरायझ करणं आणि केसांना चमकदार बनवण्यासाठी नारळ उपयुक्त आहे. नारळामुळे केसांचं आतून पोषण होतं आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. या चार गोष्टींमुळे केस पांढरं होणं कमी होईलच पण योग्य पोषण मिळाल्यानं केसांची वाढही जलद होऊ शकते.
या गोष्टीही ठरतील उपयुक्त -
हिरव्या भाज्या, सुकामेवा आणि बिया यांचा आहारात समावेश करा.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची कमतरता दूर केली की केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.
ताण कमी करण्यासाठी योगासनं आणि ध्यान करा.
पुरेशी झोप घ्या आणि जंक फूडपासून दूर रहा.
लहान वयात केस पांढरे होणे आता सामान्य आहे, परंतु योग्य पोषणाने ते रोखता येतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे ताण न घेता हे बदल करुन बघा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
White Hair : केस काळे करण्यासाठी महत्त्वाचे चार जिन्नस, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळे