Sugar effects : साखरेचे हानिकारक परिणाम वाचा, साखरेला करा हद्दपार, ही माहिती नक्की वाचा

Last Updated:

गोड खाल्ल्यानं त्वचेची लवचिकता कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा खूप लवकर दिसू लागतात. यामुले वयाच्या तिशीतच वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात. त्वचा तरुण आणि चमकदार दिसावी असं वाटत असेल तर आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करा.

News18
News18
मुंबई : गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी म्हणजे सणांचे, नैवेद्याचे आणि गोड धोड बनवण्याचे दिवस. भारतात गोड खाणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांना गोड खाण्यासाठी निमित्त लागत नाही. काही जण जेवणानंतर गोड खातात, काहींना मिठाई आवडते, काहींना चॉकलेट आवडतात तर काहींना कोल्ड्रिंक्सशिवाय राहता येत नाही. पण यातल्या साखरेनं तुमची त्वचा निस्तेज, सैल होऊ शकते. याचा विचार कधी केला नसेल तर आता नक्की करा.
advertisement
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थांच्या अतिसेवनाचा केवळ शरीरावरच नाही तर चेहऱ्यावरही परिणाम होतो. जास्त साखरेमुळे कोलेजनचं नुकसान होतं, वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसतात. मुरुमांचं प्रमाण वाढतं आणि पिगमेंटेशनचं प्रमाण वाढतं.
त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा जाणवतात. जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानं ग्लायकेशन प्रक्रिया सक्रिय होते. यामुळे त्वचेचं नुकसान होऊन, त्वचेचा पोत कमकुवत बिघडतो.
advertisement
गोड खाल्ल्यानं त्वचेची लवचिकता कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा खूप लवकर दिसू लागतात. यामुले वयाच्या तिशीतच वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात. त्वचा तरुण आणि चमकदार दिसावी असं वाटत असेल तर आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करा.
गोड खाण्याचे तोटे -
त्वचा निस्तेज होणं आणि चरबी जमा होणं - जास्त गोड पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. गाल निस्तेज होऊ लागतात. डबल चीन दिसते. ओठ आणि कानांभोवतीची त्वचा सैल होते.
advertisement
मुरुमं - साखरेमुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे तेलाचं उत्पादन वाढतं आणि यामुळे मुरुमं वाढतात. त्वचेवर बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. मधुमेहींमध्ये ही समस्या अधिक गंभीर असू शकते.
पिग्मेंटेशनची समस्या - गोड खाल्ल्यानं हार्मोनल असंतुलन होतं, ज्यामुळे त्वचेचं पिग्मेंटेशन वाढतं. चेहऱ्यावर काळे डाग आणि ठिपके येऊ शकतात. साखरयुक्त फळे आणि भाज्या देखील टाळाव्यात. गुळ, खजूर आणि यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
त्वचेचा काळसरपणा - जास्त गोड पदार्थ खाणाऱ्यांच्या त्वचेच्या काही भागात काळसरपणा येऊ शकतो. विशेषतः ज्यांना आधीच पिगमेंटेशन किंवा मुरुमांची समस्या आहे, त्यांना हा त्रास जास्त जाणवतो. अनेक संशोधनातून तज्ज्ञांनी ही निरीक्षणं मांडली आहेत.
अशा समस्या जाणवत असतील, चेहऱ्यावर फरक जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि गोड पदार्थांचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे. गोड पदार्थांची चव चांगली वाटत असली तरी, जास्त साखर खाणं म्हणजे विष खाण्यासारखं आहे असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे चमकदार, निरोगी आणि तरुण त्वचेसाठी गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sugar effects : साखरेचे हानिकारक परिणाम वाचा, साखरेला करा हद्दपार, ही माहिती नक्की वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement