कोणते चॉकलेट्स आरोग्यासाठी फायद्याचे ?
आपल्या सगळ्यांसाठी चॉकलेट म्हणजे तपकिरी रंगाचा गोड पदार्थ. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मिल्क चॉकलेट्स, व्हाईट चॉकलेट्स, जर्मन चॉकलेट्स, कमी गोड चॉकलेट्स, कोको चॉकलेट्स आणि डार्क चॉकलेट्स असे चॉकलेट्सचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी डार्क चॉकलेट्स हे आरोग्याच्या जास्त फायद्याचे असतात. डार्क चॉकलेट्समध्ये जवळपास 70 % कोको पावडर असते. याशिवाय यात साखरेचं प्रमाण कमी असल्याने डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायद्याचं मानले जातात.
advertisement
जाणून घेऊयात नियंत्रित प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं आरोग्यासाठी कसं फायद्याचं ठरू शकतं ?
डार्क चॉकलेट्सचे फायदे
डार्क चॉकलेट्समध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारखी अँटिऑक्सिडंट्स आणि विविध खनिजं आढळून येतात. अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्स निष्प्रभ होऊन ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. त्यामुळे आजारांचा धोकाही कमी होतो. कोको बीन्समध्ये आढळणारे फ्लॅव्हनॉल्स, कॅटेचिन आणि एपिकेटचिन सूज कमी करतात. रक्तवाहिन्यांमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्याने रक्त प्रवाह सुधारायला आणि रक्तातल्या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. याचा थेट फायदा हृदयाच्या आरोग्याला होतो. जेणकरून रक्तदाब नियत्रंणात राहून हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. कोकोमधील अँटिऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि कर्करोगाचा होण्याचा धोका कमी करतात. तर सेलेनियम सारखी खनिजं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय डार्क चॉकलेट्स हे सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे फील-गुड हार्मोन्स शरीरत सोडण्यात मदत करतात. ज्यामुळे तणाव कमी होऊन मूड फ्रेश व्हायला मदत होते. याशिवाय ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी चिडचिड किंवा अन्य त्रास होतो अशा महिलांनी नियंत्रित प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं फायद्याचं ठरतं.
हे सुद्धा वाचा : ही आहेत जगातील 10 महागडी चॉकलेट्स, एकाची किंमत तर 12 कोटी रुपये
डार्क चॉकलेट्सचा वापर
डार्क चॉकलेट्स हे आपल्याला कच्चं किंवा आहेत त्या स्वरूपात थेट खाता येतंच. तुम्ही पॅनकेक, स्मूदी किंवा इतर मिठाईंमध्ये देखील डार्क चॉकलेट घालून खाऊ शकता. त्यामुळे फक्त त्या पदार्थांची चवच नक्कीच वाढू शकेल. मात्र इतर चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कमी साखर जरी असली तरीही डार्क चॉकलेट्सचा नियंत्रित वापर आरोग्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. अन्यथा रक्तातली साखर वाढण्याची भीती असते.