रोज खा 5 ग्रॅम चॉकलेट, शरीराला होईल फायदा; ‘या’ आजारपासून राहाल दूर
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात. चॉकलेट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे देखील आहेत.
advertisement
हे कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण हे खर आहे. डार्क चॉकलेट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे होतात. हेच फायदे कोणते आहेत आणि खायची योग्य पद्धत काय आहे याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे म्हणजे लो बीपी आहे अशा व्यक्तींनी डार्क चॉकलेट हे खायला पाहिजे. यामुळे त्यांचा रक्तदाब नियंत्रणामध्ये येतो. जेव्हा आपण पोटामध्ये काही सॉलिड अन्न घेतो म्हणजे नाष्टा केल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर त्यानंतर दररोज शरीरात फक्त पाच ग्रॅम एवढं चॉकलेट जायला पाहिजे. चॉकलेटची मात्रा जरी कमी असले तरी सुद्धा ती मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करते.
advertisement
त्याचबरोबर बीपी कमी किंवा वाढला असेल तर तो सुद्धा या डार्क चॉकलेटमुळे नियंत्रणात येतो. बीपी वाढला असेल तर तुम्ही कोणत्याही पेयासोबत ज्यूस सोबत डार्क चॉकलेट क्रश करून घेऊ शकता किंवा नारळ पाण्यासोबत सुद्धा तुम्ही चॉकलेट क्रश करून घेतले तरी चॉकलेटमध्ये असलेल्या घटकांमुळे बीपी हा नियंत्रणात यायला मदत होते. पण त्याची मात्र ही पाच ग्रॅम एवढीच असावी त्यापेक्षा जास्त नसावी, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
advertisement
advertisement