Buck teeth & Junk Food: ऐकावं ते नवलंच! चॉकलेट, चिप्स खाल्याने मुलांचे दात पुढे येतात, जबड्याची बिघडते ठेवण आणि आकार

Last Updated:

Junk Food & Buck teeth connection in Marathi: जेव्हा एक घास जास्त वेळा चावून, चघळून खाल्ला जातो तेव्हा चेहऱ्याची हाडं आणि स्नायूं कार्यान्वित राहतात. ज्यामुळे दातांची आणि जबड्याची ठेवण नीट राहते. मात्र अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये अन्न जास्त चावलं आणि चघळलं जात नाही त्यामुळे दातांच्या आणि जबड्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते नवलंच! चॉकलेट, चिप्स खाल्याने मुलांचे दात पुढे येतात, जबड्याची बिघडते ठेवण आणि आकार
प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते नवलंच! चॉकलेट, चिप्स खाल्याने मुलांचे दात पुढे येतात, जबड्याची बिघडते ठेवण आणि आकार
मुंबई : लहान मुलांना चॉकलेट, चिप्स आणि आईस्क्रीम हे प्रचंड आवडतं. आरोग्यासाठी हे पदार्थ, जंकफूड जितके घातक आणि धोकादायक आहेत तितकेच हे पदार्थ त्यांच्या दातांच्या आरोग्यासाठी आणि जबड्याचा योग्य आकारासाठी आणि त्यांच्या चांगल्या व्यक्तीमत्त्वासाठी घातक आहेत. विश्वास नाही बसत मग वाचा ही माहिती.लहान मुलांना अनेकदा अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UFP) जसं की चिप्स, आईस्क्रिम किंवा पॅक्ड फ्रुट ज्यूस प्यायला आवडतं. अनेकादा त्यांचे पालकही त्याचे लाड करण्यासाठी हे पदार्थ त्यांना आवडीने आणून देतात. मुलांना हे पदार्थ चविष्ठ जरी वाटत असले तरीही त्याचे धोके आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्समध्ये कॅलरीज, साखर आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग होण्याची भीती असते. या पदार्थांमुळे मुलांच्या दातांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. मात्र हा धोका फक्त दात किडण्यापुरता आणि ते पडून त्यांचं नुकसान होण्यापुरता मर्यादित नाहीये.  तर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा मुलांच्या दातांची ठेवण आणि त्यांच्या जबड्यावरही परिणाम करत असल्याचं एका अभ्यासात दिसून आलंय.

जबड्याला धोका कसा ?

Buck teeth & Junk Food connection in Marathi: ऐकावं ते नवलंच! चॉकलेट, चिप्स खाल्याने मुलांचे दात पुढे येतात, जबड्याची बिघडते ठेवण आणि आकार
आपल्याला आठवत असेल लहानपणी  जेव्हा आपला एखादा दात तुटायाचा किंवा लहान मुलांचे दुधाचे दात पडल्यानंतर आपले आई-वडिल आपल्याला किंवा आपण लहान मुलांना दात नसलेल्या जागी सतत जीभ न लावयाचा सल्ला द्यायचो. कारण काय तर ? जीभ लावल्यामुळे दात पुढे सरकून दातांची ठेवण बिघडेल आणि जबड्याचा आकार बदलेल.
advertisement

अभ्यासात काय आढळलं ?

संशोधकांनी 3 ते 5 वयोगटातील मुलांचं परीक्षण केल्यावर त्यांना असं आढळून आलं की, प्रोसेस्ड फूडपेक्षा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे खाताना ते जास्त चावलं किंवा चघळलं जात नाही. कारण या पदार्थांना भाज्या आणि किंवा अन्य पोषक आहारांपेक्षा फारच कमी चघळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जबड्याचे स्नायू योग्य प्रकारे वापरले जात नाहीत. आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, एक घास 32 वेळा चावून खायचा. याचे 2 फायदे होतात. एक तर अन्नाचे बारीक तुकडे होऊन ते लवकच पचतं. त्यामुळे पचनक्रियेवर ताण येत नाही. शिवाय जेव्हा एक घास जास्त वेळा चावून, चघळून खाल्ला जातो तेव्हा चेहऱ्याची हाडं आणि स्नायूं कार्यान्वित राहतात. ज्यामुळे दातांची आणि जबड्याची ठेवण नीट राहते. मात्र अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये अन्न जास्त चावलं आणि चघळलं जात नाही त्यामुळे दातांच्या आणि जबड्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
फळं, भाज्या किंवा नैसर्गिक प्रथिनं असलेले पदार्थ खाणं हे निरोगी जबड्याच्या विकासासाठी आवश्यक आहे. या पदार्थांमुळे दातांचं आरोग्य चांगलं तर राहतंच मात्र त्याचसोबत दातांची ठेवणही चांगली राहून जबड्याचा आकार सुधारतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Buck teeth & Junk Food: ऐकावं ते नवलंच! चॉकलेट, चिप्स खाल्याने मुलांचे दात पुढे येतात, जबड्याची बिघडते ठेवण आणि आकार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement