TRENDING:

Liver : खाण्याच्या चुकीच्या सवयींचा यकृतावर परिणाम, समजून घेऊया खाण्याच्या वेळा पाळण्याचं महत्त्व

Last Updated:

चुकीच्या खाण्याच्या वेळेमुळे आपल्या यकृताच्या कार्यावर थेट परिणाम होतो असं अलीकडील एका संशोधनातून समोर आलं आहे. पाहूयात यकृताच्या कार्यावर याचा परिणाम कसा होतो. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : खाणं व्यवस्थित असेल तर आपली तब्येत चांगली राहते हे आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. खाण्याच्या अनियमित सवयी आणि वाईट दिनचर्येमुळे आपल्या आरोग्याचं नुकसान होतं. विचित्र वेळी खाण्याची सवय शरीराच्या अंतर्गत घड्याळावर वाईट परिणाम करू शकते.
News18
News18
advertisement

चुकीच्या खाण्याच्या वेळेमुळे आपल्या यकृताच्या कार्यावर थेट परिणाम होतो असं अलीकडच्या एका संशोधनातून समोर आलं आहे. पाहूयात यकृताच्या कार्यावर याचा परिणाम कसा होतो.

Hair Care : केसांच्या वाढीसाठी उपयुक्त बिया, जाणून घ्या कसा करायचा वापर

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधक मेल्टेम वेगर यांनी या अभ्यासात एक अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. आपल्या यकृताचं स्वतःचं 'बॉडी क्लॉक' असतं. यकृत आपल्या रक्तात फिरणारी बहुतेक प्रमुख प्रथिनं तयार करतं.

advertisement

पूर्वी असे मानले जात होते की यकृत एकसमान दरानं प्रथिनं शरीरात सोडते, पण नवीन संशोधनात आणखी माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार, यकृत चोवीस तासांच्या लयीत कार्य करतं आणि त्यानुसार शरीरात प्रथिनं सोडली जातात.

नेचर मेटाबोलिझम जर्नलमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष समजून घेऊयात. जे लोक शिफ्टमधे काम करतात किंवा अनियमित वेळी खातात त्यांच्या यकृताचं कार्य बिघडू शकतं.

advertisement

Burnout : बर्न आऊट म्हणजे काय ? बर्न आऊटचा शरीरावर काय परिणाम होतो ?

अनियमित खाण्याच्या सवयी यकृताच्या सर्कॅडियन रिदम म्हणजेच लयीमधे व्यत्यय आणतात. यकृत शरीराच्या घड्याळानुसार प्रथिने सोडत असल्यानं, अनियमित खाण्यामुळे ही प्रक्रिया विस्कळीत होते.

लठ्ठपणा आणि रोगाचा धोका - यकृताच्या या चोवीस तासांच्या लयीत व्यत्यय येणं आपल्या आरोग्यासाठी गंभीर असू शकते असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. यकृताचे प्रथिनं सोडण्याचं चक्र विस्कळीत होतं, तेव्हा ते लठ्ठपणामुळे दीर्घकाळ होणारे आजार सुरु होऊ शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी भांडवलात सुरू करा तेल घाणा व्यवसाय, मिळेल नफाच नफा, संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

यकृताच्या कामाचा आणि लठ्ठपणा यांच्यातील संबंध समजून घेण्याच्या दिशेनं हे संशोधन महत्त्वाचं पाऊल आहे. आण्विक पातळीवर ही लय कशी कार्य करते हे स्पष्ट करणारा हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. आपल्या दैनंदिन दिनचर्यांचा आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या शरीराच्या अंतर्गत यंत्रणेवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी हे संशोधन खूपच उपयुक्त ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Liver : खाण्याच्या चुकीच्या सवयींचा यकृतावर परिणाम, समजून घेऊया खाण्याच्या वेळा पाळण्याचं महत्त्व
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल