जाणून घेऊयात इचिनेशियाचे आरोग्यदायी फायदे
मन:स्थिती सुधारण्यासाठी
कोणत्या कारणामुळे तुम्ही नाराज किंवा उदास असाल आणि यावेळी जर तुम्ही इचिनेशियाच्या पानांचा किंवा पावडरचा चहा घेतला तर तुमचा मूड चांगला होऊ शकतो. इचिनेशियामध्ये अल्कामाइड्स, रोस्मेरिनिक एसिड आणि कॅफिक एसिड असतात, ज्यामुळे चिंता किंवा उदास वाटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्ही तणावात असाल किंवा एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल तर इचिनेशियाचा चहाचा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
वेदनाशमक
इचिनेशियामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ किंवा दुखणं कमी करतात. याशिवाय जर तुम्हाला मुका मार लागला असेल किंवा सूज आली असेल तर त्यावरही इचिनेशिया गुणकारी ठरू शकतं. हिवाळ्यात होण्याऱ्या सांधेदुखीच्या त्रासावर इचिनेशिया फायदेशीर आहे.
डायबिटीस
डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठीही इचिनेशिया खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार, असं आढळून आलंय की इचिनेशियाच्या सेवनामुळे इन्सुलिनच्या स्त्रावाचं प्रमाण वाढलं. ज्याचा फायदा टाइप 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या झाला. त्याची रक्तातली वाढलेली साखर नियंत्रणात आली.
रोगप्रतिकारक शक्ती
इचिनेशियात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायाला मदत होते. इचिनेशियाच्या पानांमध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी मुळे अनेक ससंर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव होतो. एका अभ्यासानुसार, इचिनेशिया ही श्वसन रोगांवर देखील गुणकारी ठरल्याचं दिसून आलंय.
