मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करणं आवश्यक आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करणं गरजेचं आहे समजून घेऊया.
पांढरा ब्रेड, रिफाइंड पीठ आणि तांदूळ यांऐवजी बार्ली, ओट्स, ब्राऊन राईस आणि नाचणीसारखं संपूर्ण धान्य खा. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं.
Digestion : अनेक रोगांवर गुणकारी, घरातले दोन जिन्नस शरीरासाठी उपकारक
advertisement
हिरव्या पालेभाज्या, बीन्स, डाळी आणि फळं हे फायबरचे उत्तम स्रोत आहेत. डाळी, अंडी, मासे, टोफू आणि काजू देखील खा. भूक नियंत्रित करण्यासाठी आणि उर्जेची पातळी स्थिर करण्यासाठी याची मदत होते.
मधुमेह व्यवस्थापनासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित होण्यास मदत होते. शिवाय, व्यायाम वजन कमी करण्यास मदत करू शकतो.
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी थोडं वजन कमी करणं देखील खूप फायदेशीर ठरू शकतं. म्हणून, दररोज किमान 30-45 मिनिटं वेगानं चालणं, सायकलिंग, पोहणं, योगा किंवा इतर एरोबिक व्यायाम करा.
वजन नियंत्रित करा - जास्त वजन, विशेषतः पोटाची चरबी, इन्सुलिन प्रतिरोधकतेस कारणीभूत ठरते. वजन नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहार आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करा. वजन केवळ 5-10 % कमी केल्यानं रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Winter Care : कोरड्या हवेतही केस राहतील मजबूत, या टिप्सचा होईल फायदा
ताण व्यवस्थापन - ताणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ताणतणावात, शरीर कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारखे हार्मोन्स सोडतं, जे यकृतातून साखर बाहेर टाकून रक्तातील साखरेची पातळी वाढवते. प्राणायाम, ध्यान आणि योग हे ताण कमी करण्याचे उत्तम मार्ग आहेत. ताण व्यवस्थापनासाठी पुरेशी झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे.
पुरेशी झोप घ्या - शरीराची दुरुस्ती आणि रिचार्जिंगसाठी 7-8 तासांची झोप आवश्यक आहे. योग्य झोपेच्या अभावानं इन्सुलिन प्रतिरोध वाढतो आणि भूकेच्या संप्रेरकांचं असंतुलन होतं. ज्यामुळे गोड पदार्थांची तीव्र इच्छा वाढते. म्हणून, दररोज 7-8 तास गाढ झोप घेण्याचं लक्ष्य ठेवा. तसंच, झोपण्याची वेळ निश्चित ठेवा.
