advertisement

Winter Care : हिवाळ्यातही दिसतील केस मऊशार, केसांची निगा राखण्यासाठी हे घटक महत्त्वाचे

Last Updated:

हिवाळ्यात मेथीचे दाणे, दही, मध, नारळ तेल, कोरफड याचा वापर करुन केसांची निगा राखणं उपयुक्त ठरतं. या नैसर्गिक घटकांमुळे केसांमधला कोरडेपणा कमी होतो आणि या घटकांच्या नियमित वापरानं केसांमधे आर्द्रता कायम राहते. 

News18
News18
मुंबई : हिवाळा सुरु झाला म्हणजे त्वचेच्या समस्या सुरु होतात. केस कोरडे होतात. हिवाळ्यात कोरड्या केसांवर घरगुती उपाय करुन पाहता येतील. या उपायांमुळे केस मुलायम होतील.
हिवाळ्यात मेथीचे दाणे, दही, मध, नारळ तेल, कोरफड याचा वापर करुन केसांची निगा राखणं उपयुक्त ठरतं. या नैसर्गिक घटकांमुळे केसांमधला कोरडेपणा कमी होतो आणि या घटकांच्या नियमित वापरानं केसांमधे आर्द्रता कायम राहते.
मेथीचे दाणे - मेथीच्या दाण्यांमधे प्रथिनं आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर असतात. निस्तेज केसांसाठी, मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि नंतर ते तुमच्या टाळूला लावा. हे लावण्यासाठी कापसाचा वापर करू शकता. यामुळे केस मुळांपासून मजबूत आणि काळे होतात.
advertisement
दह्यासोबत मध -  हिवाळ्यातही केसांवरची चमक आणि मऊपणा कायम राहावा यासाठी दही आणि मध फायदेशीर ठरू शकतात. यासाठी एका लहान भांड्यात दही घ्या आणि त्यात मध पूर्णपणे मिसळा. नंतर ते केसांना हेअर मास्क म्हणून लावा आणि थोड्या वेळानं धुवा. यामुळे कोरडे केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.
advertisement
नारळ तेल आणि कोरफड - हिवाळ्यात, थंड हवेमुळे केसांचा ओलावा हिरावून घेतला जातो. कोरड्या केसांत, ओलावा निर्माण करण्यासाठी नारळ तेल आणि कोरफड अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. हे करण्यासाठी, एका भांड्यात कोरफडीचा गर आणि नारळाचं तेल मिसळा. ही पेस्ट तुमच्या टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. यामुळे तुमचे केस हायड्रेट होतील आणि हळूहळू कोरडेपणा दूर होईल.
advertisement
कोरफड गर आणि दही -  निस्तेज आणि कोरड्या केसांना चमक देण्यासाठी कोरफड गर आणि दही वापरू शकता. दोन चमचे कोरफड गर दोन चमचे दह्यात मिसळा. हा हेअर मास्क केसांना लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. नंतर, केस स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे केस मॉइश्चरायझ होतील आणि ते पूर्वीपेक्षा अधिक चमकदार होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यातही दिसतील केस मऊशार, केसांची निगा राखण्यासाठी हे घटक महत्त्वाचे
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement