Banana : केळ खाण्याचे अगणित फायदे, पचन, रक्तदाबापासून, हृदयाच्या आरोग्यापर्यंत उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अलाबामा विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, महिनाभर दररोज एक केळं खाल्ल्यानं दम्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. केळी खाल्ल्यानं पचन सुधारतं आणि हृदयाच्या आरोग्यापासून ते रक्तदाबापर्यंत सर्व गोष्टींना फायदा होतो.
मुंबई : केळी हे सहज, स्वस्त आणि वर्षभर उपलब्ध असणारं फळ. सर्व ऋतूंमध्ये केळी खाता येतात. केळी खाणं केवळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसंच यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होतं.
अलाबामा विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, महिनाभर दररोज एक केळं खाल्ल्यानं दम्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. केळी खाल्ल्यानं पचन सुधारतं आणि हृदयाच्या आरोग्यापासून ते रक्तदाबापर्यंत सर्व गोष्टींना फायदा होतो.
केळ्यात जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत.
advertisement
केळ्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 आणि फायबर सारखे पोषक घटक भरपूर असतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज देखील असतं, यामुळे हृदयाचं आरोग्य आणि पचन सुधारण्यास मदत होते. एका मध्यम आकाराच्या केळ्यात अंदाजे 105 कॅलरीज, 27 ग्रॅम कर्बोदकं आणि तीन ग्रॅम फायबर असतं.
शरीराची ऊर्जा - दररोज एक केळं खाल्ल्यानं शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. केळ्यात कर्बोदकं आणि नैसर्गिक साखर असते. दररोज एक केळ खाल्ल्यानं दिवसभर ऊर्जा मिळते.
advertisement
मजबूत पचनसंस्था - केळी खाणं पचनसंस्था मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. यातल्या फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते आणि आतड्यांच्या हालचाली नियंत्रित होतात. यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.
हृदयासाठी फायदेशीर - केळ्यात पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. दररोज एक केळी खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होतो.
advertisement
वजन कमी करण्यात प्रभावी - वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी केळी फायदेशीर ठरू शकतात. केळ्यात फायबर आणि पाणी असतं, ज्यामुळे जास्त काळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - केळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. दररोज एक केळ खाल्ल्यानं त्वचेला आणि केसांना पोषण मिळतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Banana : केळ खाण्याचे अगणित फायदे, पचन, रक्तदाबापासून, हृदयाच्या आरोग्यापर्यंत उपयुक्त


