सोपे व्यायाम करून आणि सवयी बदलून घोरणं बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकतं. निसर्गोपचार डॉक्टर आणि संशोधक जेनिन बोवरिंग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी घोरणं कमी करण्यास मदत करणारे पाच सोपे व्यायाम समजावून सांगितले आहेत.
advertisement
जीभ मागे सरकवणं - प्रथम, जिभेचे टोक तुमच्या वरच्या दातांच्या मागे ठेवा आणि हळूहळू जीभ तोंडाच्या वरच्या भागावर मागे सरकवा. हे पाच वेळा करा. यामुळे जीभ आणि टाळूचे स्नायू मजबूत होतात आणि झोपेच्या वेळी ती योग्य स्थितीत ठेवण्यास मदत होते.
क्लिक करण्याचा आवाज - जीभ तोंडाच्या टाळूला चिकटवून क्लिक करण्याचा आवाज करा. हे सलग दहा वेळा करा. या व्यायामामुळे जीभ आणि तोंडाचे स्नायू देखील मजबूत होतात, ज्यामुळे झोपताना तोंड उघडं राहण्याची शक्यता कमी होते आणि घोरणं कमी होतं.
म्यूइंग - म्यूइंग ही एक विशेष तंत्र आहे. यात जिभेनं टाळूवर हलका दाब द्यावा. दहा सेकंद दाब द्या आणि ही प्रक्रिया पाचवेळा पुन्हा करा. यामुळे घोरणं नियंत्रित होण्यास मदत होते तसंच चेहऱ्याच्या आकारासाठी आणि जबड्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं.
Weight Reduction : नियमितपणे करा आठ व्यायाम, महिनाभरात होईल वजन कमी, जाणून घ्या पद्धत
स्वर - A, E, I, O आणि U हे स्वर मोठ्यानं आणि स्पष्टपणे उच्चारले पाहिजेत. डॉ. जॅनिन यांच्या मते, त्यांची वारंवार पुनरावृत्ती केल्यानं घशातील आणि तोंडातील स्नायू सक्रिय होतात, वायुमार्ग उघडे राहतात आणि घोरणं कमी होतं.
गाणं - गाणं आवडत असेल हा सर्वोत्तम उपाय आहे. गाण्यामुळे तोंडातील आणि घशातील स्नायू मजबूत होतात आणि त्यांची लवचिकता वाढते. यामुळे वायुमार्ग उघडे राहतात आणि घोरणं लक्षणीयरीत्या कमी होतं.
निसर्गोपचार डॉक्टरांच्या मते, दररोज काही मिनिटं हे सोपे व्यायाम केल्यानं घोरणं कमी होऊ शकतं. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.