TRENDING:

Electric Kettle Uses : इलेक्ट्रिक केटलमध्ये केवळ चहाच नाही, तर बनू शकतात 'हे' पदार्थ! होस्टेलर्ससाठी बेस्ट पर्याय

Last Updated:

Food made in Electric Kettle : होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. इलेक्ट्रिक केटलमध्ये फक्त पाणी गरम करणं नाही, तर त्यामध्ये तुम्ही काही सोपे पदार्थही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक केटलमध्ये बनवता येणारे काही पदार्थ सांगत आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हल्ली बऱ्याच लोकांकडे इलेक्ट्रिक केटल असते. तिचा उपयोग बहुतांश लोक फक्त पाणी गरम करण्यासाठी करतात. खरं तर ती बनवलीच गेली फक्त त्याचसाठी आहे. पण जुगाडू लोक प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे शोधून काढतातच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक केटल. याचा वापर करून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता.
इलेक्ट्रिक केटलमध्ये बनवता येणारे पदार्थ..
इलेक्ट्रिक केटलमध्ये बनवता येणारे पदार्थ..
advertisement

होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. इलेक्ट्रिक केटलमध्ये फक्त पाणी गरम करणं नाही, तर त्यामध्ये तुम्ही काही सोपे पदार्थही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक केटलमध्ये बनवता येणारे काही पदार्थ सांगत आहोत. तुम्ही होस्टेलला राहात असाल तर या रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहेत.

इलेक्ट्रिक केटलमध्ये बनवता येणारे पदार्थ..

ओट्स : फिटनेस फ्रिक लोकांसाठीही इलेक्ट्रिक केटल उपयुक्त असते. सकाळी वेळ कमी असताना तुम्ही यामध्ये फटाफट ओट्स तयार करू शकता. यासाठी इलेक्ट्रिक केटलमध्ये पाणी उकळवा आणि ते तुमच्या ओट्स किंवा दलियाच्या मिश्रणावर टाका. झाकण ठेवून काही मिनिटे भिजू द्या. तुम्ही पाण्याच्या जागी दूधही वापरू शकता.

advertisement

इन्स्टंट नूडल्स आणि सूप : बऱ्याचदा आपल्या जेव्हा यावेळी भूक लागते, खाण्यासाठी काहीही नसतं आणि आपण होस्टेलवर असतो, तेव्हा इलेक्ट्रिक केटल आपल्या खूप कमी येऊ शकते. तुम्ही अशावेळी इलेक्ट्रिक केटलमध्ये मॅगी किंवा सूप बनवू शकता. केटलमध्ये पाणी उकळवा, त्यात नूडल्स किंवा सूप मिक्स टाका आणि काही मिनिटे शिजू द्या. तुमची डिश तयार होईल.

advertisement

भात : तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण तुम्ही इलेक्ट्रिक केटलमध्ये भातदेखील बनवू शकता. तुमचे इलेक्ट्रिक केटल पसरत असेल तर त्यामध्ये बसणारं एक भांडं घ्या, त्यामध्ये तांदूळ, मीठ आणि पाणी घाला. इलेक्ट्रिक केटलचालू करा आणि पाणी उकळू द्या. उकळी आली की केटल बंद करा, पण तांदळाचे भांडे त्यातच राहू द्या. बंद करून 15-20 मिनिटं ठेवा. यानंतर तुम्हाला मऊसूत भात मिळेल.

advertisement

बॉइल्ड एग्ज : अंडी उकळण्यासाठीही इलेक्ट्रिक केटल कमी येते. यासाठी इलेक्ट्रिक केटलमध्ये अंडी टाका, अंडी बुडतील एवढे पाणी टाका आणि स्विच चालू करा. 10-12 मिनिटांनी चेक करा. तुमची उकडलेली अंडी तयार होतील.

उकडलेल्या भाज्या : तुम्हाला फक्त उकडलेल्या भाज्या खाण्याची सवय असेल तर हे काम तर इलेक्ट्रिक केटलमध्ये अगदी सोपं आहे. केटमध्ये पाणी टाका. त्यानंतर एका भांड्यात भाज्या आणि थोडं पाणी घेऊन ते भांडं केटलमध्ये ठेवा. पाणी उकळल्यानंतर केटल बंद करा आणि झाकण ठेवा. काही वेळात तुमच्या वाफवलेल्या भाज्या तयार होतील.

advertisement

हर्बल टी : सध्या चहाऐवजी तुम्ही हर्बल टी पिणे पसंत करत असाल तर तर यासाठी इलेक्ट्रिक केटल बेस्ट पर्याय आहे. इलेक्ट्रिक केटलमध्ये पाणी उकळवा आणि ते तुमच्या चहाच्या पानांवर किंवा औषधी वनस्पतींवर ओता. झाकण ठेवून थोडा वेळ राहू द्या. काही मिनिटांनी फ्रेश हर्बल टी तयार होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलमध्ये महाग मिळणारं इटालियन डेझर्ट फक्त 50 रुपयांपासून, मुंबई हे आहे लोकेशन
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Electric Kettle Uses : इलेक्ट्रिक केटलमध्ये केवळ चहाच नाही, तर बनू शकतात 'हे' पदार्थ! होस्टेलर्ससाठी बेस्ट पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल