advertisement

हॉटेलमध्ये महाग मिळणारं इटालियन डेझर्ट फक्त 50 रुपयांपासून, मुंबई हे आहे लोकेशन

Last Updated:

परदेशातील लोकप्रिय डेझर्ट्सची खास मेजवानी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अगदी 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या दरात विविध चविष्ट पर्याय उपलब्ध असल्याने तरुणाईत या स्टॉलची जोरदार चर्चा सुरू आहे.

+
News18

News18

मुंबई : मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजच्या कट्ट्यावर सध्या गोड सुगंध दरवळताना दिसत आहे. कारण येथे देवगड किचन या स्टॉलने परदेशातील लोकप्रिय डेझर्ट्सची खास मेजवानी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अगदी 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या दरात विविध चविष्ट पर्याय उपलब्ध असल्याने तरुणाईत या स्टॉलची जोरदार चर्चा सुरू आहे. कमी बजेटमध्ये वेगळ्या चवींचा आस्वाद घेण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांची पावले आपोआप या स्टॉलकडे वळत आहेत.
या स्टॉलवर सध्या इटालियन डेझर्ट तिरामिसू विशेष आकर्षण ठरत आहे. त्यासोबतच मिनी चीज केक अवघ्या 50 रुपयांत मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठा आहे. ब्राऊनीचे दर 80 ते 120 रुपयांपर्यंत असून विविध फ्लेवर्समध्ये त्यांची रेलचेल पाहायला मिळते. रेग्युलर चीज केक 100 रुपयांना तर ग्लास केक 70 रुपयांना उपलब्ध आहे. खास बिस्कॉफ ब्राऊनीही येथे मिळत असून तिची चव चाखण्यासाठी अनेक जण आवर्जून भेट देत आहेत. प्रत्येक पदार्थाची चव आणि सादरीकरण याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे ग्राहक सांगतात.
advertisement
स्टॉलचे आकर्षक सादरीकरणही ग्राहकांना भुरळ घालत आहे. रंगीबेरंगी टॉपिंग्स, नीटनेटकी पॅकिंग असे आकर्षक डेझर्ट्स यामुळे हा स्टॉल विद्यार्थ्यांच्या गाठीभेटींचे नवे ठिकाण बनत आहे. लेक्चरनंतर मित्रमंडळी येथे एकत्र येऊन गोड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. कमी किमतीत दर्जेदार पदार्थ मिळत असल्याने रोज सायंकाळी येथे मोठी गर्दी होत आहे.
advertisement
डेझर्ट्ससोबतच ताजेतवाने मॉकटेल्सही येथे उपलब्ध आहेत. विशेषतः मोहीतोला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. गोड पदार्थांसोबत थंडगार मॉकटेल्सचा आस्वाद घेण्यासाठी सायंकाळी येथे उत्साही वातावरण पाहायला मिळते. परदेशी चवी स्थानिक पातळीवर आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणारा देवगड किचन हा स्टॉल सध्या रुईया कॉलेज परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
हॉटेलमध्ये महाग मिळणारं इटालियन डेझर्ट फक्त 50 रुपयांपासून, मुंबई हे आहे लोकेशन
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement