advertisement

March Bank Holiday : होळी ते गुढीपाडवा... मार्चमध्ये 'इतके' दिवस बँका राहणार बंद; तुमच्या शहरात कधी आहे सुट्टी?

Last Updated:
तुम्ही भर उन्हात बँकेच्या दारापर्यंत पोहोचलात आणि तिथे 'बँकेला सुट्टी आहे' असा बोर्ड दिसला तर? तुमची हीच धावपळ टाळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मार्च 2026 मधील बँक सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर. होळी, गुढीपाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे मार्चमध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत.
1/7
फेब्रुवारी महिना संपत आला की वेध लागतात ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे आणि मार्चमधील सणासुदीचे. मार्च महिना म्हटलं की आर्थिक वर्षाचा शेवट (Financial Year Ending) आणि होळीसारखा मोठा सण ही येत असतो. मग अशा वेळी बँकेची महत्त्वाची कामं निकाली काढायची असतील, तर आधीच तयारी करणं केव्हा ही चांगलं.
फेब्रुवारी महिना संपत आला की वेध लागतात ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे आणि मार्चमधील सणासुदीचे. मार्च महिना म्हटलं की आर्थिक वर्षाचा शेवट (Financial Year Ending) आणि होळीसारखा मोठा सण ही येत असतो. मग अशा वेळी बँकेची महत्त्वाची कामं निकाली काढायची असतील, तर आधीच तयारी करणं केव्हा ही चांगलं.
advertisement
2/7
पण कल्पना करा, तुम्ही भर उन्हात बँकेच्या दारापर्यंत पोहोचलात आणि तिथे 'बँकेला सुट्टी आहे' असा बोर्ड दिसला तर? तुमची हीच धावपळ टाळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मार्च 2026 मधील बँक सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर. होळी, गुढीपाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे मार्चमध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत.
पण कल्पना करा, तुम्ही भर उन्हात बँकेच्या दारापर्यंत पोहोचलात आणि तिथे 'बँकेला सुट्टी आहे' असा बोर्ड दिसला तर? तुमची हीच धावपळ टाळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मार्च 2026 मधील बँक सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर. होळी, गुढीपाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे मार्चमध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत.
advertisement
3/7
1. होळी आणि धुलिवंदन सुट्ट्यामार्चच्या पहिल्याच आठवड्यात होळीच्या उत्सवामुळे देशभरातील बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील:

2 मार्च: होलिका दहन निमित्त कानपूर आणि लखनऊ मध्ये बँका बंद राहतील.

3 मार्च: धुलिवंदन आणि डोल जतरा निमित्त मुंबई, नागपुर, बेलापूर, पुणे, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि पाटणा सह अनेक प्रमुख शहरांत सुट्टी असेल.

4 मार्च: होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, अहमदाबाद, चंदीगड, भुवनेश्वर आणि जम्मू या ठिकाणी बँका बंद राहतील.
1. होळी आणि धुलिवंदन सुट्ट्यामार्चच्या पहिल्याच आठवड्यात होळीच्या उत्सवामुळे देशभरातील बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील:2 मार्च: होलिका दहन निमित्त कानपूर आणि लखनऊ मध्ये बँका बंद राहतील.3 मार्च: धुलिवंदन आणि डोल जतरा निमित्त मुंबई, नागपुर, बेलापूर, पुणे, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि पाटणा सह अनेक प्रमुख शहरांत सुट्टी असेल.4 मार्च: होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, अहमदाबाद, चंदीगड, भुवनेश्वर आणि जम्मू या ठिकाणी बँका बंद राहतील.
advertisement
4/7
गुढीपाडवा आणि रमजानचे वेध (मार्चचा मध्य)मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात सणांची मोठी रांग आहे:

17 मार्च: शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगर मध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.

19 मार्च: महाराष्ट्राचा मोठा सण गुढीपाडवा, तेलुगु नववर्ष आणि नवरात्रारंभ निमित्त मुंबई, नागपूर, बेलापूर, बंगळुरू, चेन्नई आणि पणजी मध्ये बँका बंद राहतील.

20 मार्च: रमजान आणि जुमत-उल-विदा निमित्त कोची, त्रिवेंद्रम, जम्मू आणि श्रीनगर मध्ये बँकांना सुट्टी असेल.
गुढीपाडवा आणि रमजानचे वेध (मार्चचा मध्य)मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात सणांची मोठी रांग आहे:17 मार्च: शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगर मध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.19 मार्च: महाराष्ट्राचा मोठा सण गुढीपाडवा, तेलुगु नववर्ष आणि नवरात्रारंभ निमित्त मुंबई, नागपूर, बेलापूर, बंगळुरू, चेन्नई आणि पणजी मध्ये बँका बंद राहतील.20 मार्च: रमजान आणि जुमत-उल-विदा निमित्त कोची, त्रिवेंद्रम, जम्मू आणि श्रीनगर मध्ये बँकांना सुट्टी असेल.
advertisement
5/7
ईद आणि रामनवमीमार्चच्या अखेरीस आर्थिक व्यवहारांची घाई असतानाही काही महत्त्वाच्या सुट्ट्या आहेत.

21 मार्च: रमजान-ईद (ईद-उल-फितर) आणि सरहुल निमित्त कोची, तिरुवनंतपुरम आणि शिमला वगळता जवळपास संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

26 मार्च: राम नवमी निमित्त अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि रांची मध्ये बँका बंद राहतील.

27 मार्च: काही शहरांमध्ये राम नवमीची सुट्टी दुसऱ्या दिवशीही असेल.

31 मार्च: आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच्या काही प्रशासकीय कारणांमुळे काही शहरांत बँकांचे सार्वजनिक व्यवहार प्रभावित होऊ शकतात.
ईद आणि रामनवमीमार्चच्या अखेरीस आर्थिक व्यवहारांची घाई असतानाही काही महत्त्वाच्या सुट्ट्या आहेत.21 मार्च: रमजान-ईद (ईद-उल-फितर) आणि सरहुल निमित्त कोची, तिरुवनंतपुरम आणि शिमला वगळता जवळपास संपूर्ण देशात बँका बंद राहतील.26 मार्च: राम नवमी निमित्त अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि रांची मध्ये बँका बंद राहतील.27 मार्च: काही शहरांमध्ये राम नवमीची सुट्टी दुसऱ्या दिवशीही असेल.31 मार्च: आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच्या काही प्रशासकीय कारणांमुळे काही शहरांत बँकांचे सार्वजनिक व्यवहार प्रभावित होऊ शकतात.
advertisement
6/7
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स:1. बँक जरी बंद असली तरी तुमची Net Banking, Mobile Banking आणि ATM सेवा सुरू असेल. तातडीच्या पैशांसाठी तुम्ही या सेवांचा वापर करू शकता.
2. सुट्ट्यांमुळे चेक क्लिअर व्हायला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करा.
3. सणासुदीच्या काळात एटीएममध्ये रोखीचा तुटवडा भासू शकतो, त्यामुळे आवश्यकतेनुसार रोख रक्कम जवळ ठेवा.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स:1. बँक जरी बंद असली तरी तुमची Net Banking, Mobile Banking आणि ATM सेवा सुरू असेल. तातडीच्या पैशांसाठी तुम्ही या सेवांचा वापर करू शकता.2. सुट्ट्यांमुळे चेक क्लिअर व्हायला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करा.3. सणासुदीच्या काळात एटीएममध्ये रोखीचा तुटवडा भासू शकतो, त्यामुळे आवश्यकतेनुसार रोख रक्कम जवळ ठेवा.
advertisement
7/7
मार्च महिन्यात सुट्ट्यांची यादी मोठी आहे, त्यामुळे तुमच्या बँकेच्या कामाचे नियोजन या यादीनुसार करा. जेणेकरून सणांचा आनंद घेताना तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
मार्च महिन्यात सुट्ट्यांची यादी मोठी आहे, त्यामुळे तुमच्या बँकेच्या कामाचे नियोजन या यादीनुसार करा. जेणेकरून सणांचा आनंद घेताना तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement