advertisement

BaaS प्रोग्रामसह EV खरेदी करणे किती फायदेशीर? 5 वर्षांच्या कॅलक्युलेशनने घ्या समजून 

Last Updated:

इलेक्ट्रिक कार घेताना मोठा प्रश्न निर्माण होतो की, बॅटरी खरेदी करावी की रेंटवर घ्या? Tata Punch EV च्या 5 वर्षे आणि 60,000च्या खऱ्या कॅलक्युलेशनवरुन चकीत करणारा फरक समोर आलाय. जाणून घ्या BaaS मध्ये किती बचत होईल. ब्रेक-ईव्हन कधी येईल आणि तुमच्यासाठी कोणता ऑप्शन जास्त फायदेशीर राहील?

ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
मुंबई : सध्याच्या काळात इलेक्ट्रिक कार खरेदी करताना एक सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. ते म्हणजे बॅटरी रेंटल घ्यावी की पूर्ण गाडी बॅटरीसह खरेदी करावी? टाटा पंच ईव्ही, एमजी विंडसर EV आणि मारुती ई-विटारासारख्या गाड्यांमध्ये BaaS पर्याय उपलब्ध असल्याने वाद तापला आहे. BaaS मध्ये अपफ्रंट खर्च 30-40 टक्के कमी होतो. मात्र प्रत्येक किमीवर बॅटरी फीस लागते.
या स्कीमची सुरुवात सर्वात आधी MG ने विंडसर ईव्हीसह केली होती. अशावेळी जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, गाडी बॅटरीसह खरेदी करणे बेस्ट आहे की मग BaaS च्या घरी आणणे जास्त फायदेशीर राहील. चला 5 वर्षांच्या रियलिस्टिक कॅलक्युलेशनने समजून घेऊया की, सरासरी भारतीय यूझर्ससाठी (दरवर्षी 12,000 किमी) कोणता पर्याय चांगला असू शकतो? आपण या योजनेबद्दल देखील जाणून घेऊ.
advertisement
BaaS काय आहे आणि कसे काम करते?
बॅटरी एज ए सर्व्हिस (BaaS) मध्ये तुम्ही कार चेसिस+मोटर+फीचर्स खरेदी करता आणि बॅटरी रेंटवर घेता. बॅटरी दुरुस्ती, डिग्रेडेशन, रिप्लेसमेंट आणि वॉरंटी पूर्णपणे कंपनीची जबाबदारी असते. टाटा पंच ईव्हीमध्ये ही पहिल्यांदा लॉन्च झाले आहे. एमजी आणि मारुतीही या मॉडलवर चालत आहे. फायद्याविषयी बोलायचं झाल्यास, कमी डाउन पेमेंट, सोपे ईएमआय आणि बॅटरीची झिरो टेन्शन राहते. खरंतर दीर्घकाळ किंवा जास्त किमीवर एकूण खर्च वाढू शकतो.
advertisement
बॅटरी खरेदी करायची की भाड्याने घ्यायची?
आता दोन्ही गणिते पाहूया. आपण नुकत्याच लाँच झालेल्या पंच ईव्हीचे उदाहरण घेऊ. आपण असे गृहीत धरत आहोत की वाहन खरेदी केल्यानंतर, यूझर ते दरवर्षी 12 हजार किमी चालवेल. या प्रकरणात, कोणाला जास्त खर्च येईल? बॅटरी खरेदी करणारा की भाड्याने घेणारा? चला शोधूया.
advertisement
BaaS ऑप्शनसह 
  • अपफ्रंट खर्च : ₹6.49 लाख
  • बॅटरी रेंटल फीस : ₹2.6 × 60,000 = ₹1.56 लाख
  • वीज खर्च : ₹1.5 प्रति किमी × 60,000 = ₹0.90 लाख (होम चार्जने)
  • मेंटेनेंस (टायर, ब्रेक, सर्व्हिस) : ₹0.20 लाख (EV मध्ये खुप कमी)
  • एकूण 5 वर्षात खर्च : ₹9.15 लाख (गाडीच्या किंमतीसह
advertisement
पूर्ण बॅटरीची (Full Ownership)
  • अपफ्रंट खर्च : ₹9.69 लाख
  • विज खर्च : ₹0.90 लाख
  • मेंटेनेंस : ₹0.20 लाख
  • एकूण 5 वर्षात खर्च : ₹10.79 लाख (गाडीच्या किंमतीसह)
विनर कोण?
BaaS ने 5 वर्षात 1.64 लाख रुपयांची बचत होईल. ब्रेक-ईव्हन पॉइंट 1,23,000 किमीच्या आसपास आहे. म्हणजेच सरासरी 12,000 किमी/वर्षे ड्राइव्ह करणाऱ्यांना 10 वर्षांनंतर फीस बरोबरीची होईल. 5 वर्षात तर BaaS चा स्पष्टपणे विजय होत आहे.
advertisement
BaaS चे फायदे 
  • कमी EMI: ₹6.49 लाखांच्या बॅटरीचा ईएमआय ₹12-13 हजार/महीना येईल. तर 9.69 लाख रुपयांच्या कारच्या ईएमआय 18-20 हजार रुपये येईल.
  • बॅटरीची नो टेन्शन : डिग्रेडेशन, ओव्हरहिटिंग किंवा 8 वर्षांनंतर रिप्लेसमेंटची चिंता कंपनीची राहील.
  • फ्लेक्सिबल : गाडी कमी चालत असेल तर फीसही कमी द्यावी लागेल.
  • रिसेल व्हॅल्यू : काही फायनेंसर 3-5 वर्षांनंतर बॅटरी खरेदी करण्याचा ऑप्शन देतात.
advertisement
पूर्ण बॅटरी खरेदीचे फायदे 
  • 1.23 लाख किमीनंतर प्रत्येक अतिरिक्त किमी एकप्रकारे फ्री होईल. बॅटरी तुमची राहील.
  • रिसेलमध्ये चांगली प्राइज मिळेल.
  • 40 kWh व्हेरिएंटमध्ये लाइफटाइम वॉरंटी (फर्स्ट ऑनर) मिळेल.
कोणासाठी कोणते चांगले आहे?
तुम्ही सरासरी यूझर असाल (10,000-15,000  किमी/वर्ष), शहरात गाडी चालवत असाल आणि दर 5-7 वर्षांनी तुमचे वाहन बदलण्याची योजना आखत असाल, तर BaaS हा सर्वोत्तम पर्याय असेल. आगाऊ खर्च कमी करा, मासिक खर्च कमी करा आणि बॅटरीचा ताण कमी करा. तसंच, जर तुम्ही महामार्गावर जास्त गाडी चालवणार असाल, तर BaaS हा सर्वोत्तम पर्याय आहे. 20,000 किमी/वर्षांपेक्षा जास्त गाडी चालली आणि 8-10 वर्ष ठेवण्याचा प्लॅन असेल तर पूर्ण बॅटरीसह कार खरेदी करणे बेस्ट ठरेल.
महत्वाची टीप: ही गणना टाटा पंच ईव्हीच्या फेब्रुवारी 2026 मधील प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत, होम चार्जिंग आणि सरासरी वापरावर आधारित आहे. स्थानिक कर, विमा आणि चार्जिंग दर वेगवेगळे असू शकतात. सोलर चार्जिंगमुळे पुढील बचत होईल. तुमच्या बजेट आणि गरजांनुसार वाहन निवडा.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
BaaS प्रोग्रामसह EV खरेदी करणे किती फायदेशीर? 5 वर्षांच्या कॅलक्युलेशनने घ्या समजून 
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement