advertisement

Kolhapur: बाइक धडकली अन् सौरभ 50 फूट उंच फेकला गेला, देवीच्या मंदिरात झाडावर आदळला, LIVE VIDEO

Last Updated:

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बाईकचा चक्काचूर झाला आहे, झाडाला धडकल्यामुळे सौरभला गंभीर दुखापत झाली  आणि यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी रस्त्यााच्या बाजूला असलेल्या सुचना फलकाला धडकली. या अपघातात तरुण दुचाकीवरून ५० फूट दूर अंतरावर फेकला गेला. या अपघातात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  हातकणंगले-कुंभोज मार्गावर ही भीषण घटना घडली आहे. सौरभ गाझी असं मृत तरुणाचं नाव आहे. सौरभ हा दूधगाव इथं राहणार होता. कामाच्या निमित्ताने सौरभ गाझी हा आपल्या दुचाकीवरून हातकणंगलेकडून दूधगावच्या दिशेनं जात होता.
advertisement
[video width="1600" height="900" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/solapur-accident-2026-02-fcbd0153ed53afc79db8287df59e0543.mp4"][/video]
लक्ष्मी मंदिराजवळ सौरभ पोहोचला असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. मुळात दुचाकीचा वेग जास्त होता, त्यामुळे सौरभला दुचाकीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. दुचाकी चक्क समोरच्या चाकावर धावत होती, त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्याा फलकाला धडकली.
फलकाला धडकल्यानंतर सौरभ हा बाईकवर ५० फूट दूर फेकला गेला. समोरच असलेल्या लक्ष्मी मंदिराच्या झाडाला जाऊन सौरभ धडकला. त्याच्यापाठोपाठ बाईक त्याच्या अंगावर येऊन आदळली. हाा सगळा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बाईकचा चक्काचूर झाला आहे, झाडाला धडकल्यामुळे सौरभला गंभीर दुखापत झाली  आणि यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. त्याला तातडीने नजिकच्या रुग्णालयातही दाखल केलं होतं. पण, डॉक्टरांनी तपासून सौरभला मृत घोषित केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुण सौरभच्या अपघाती मृत्यूमुळे गाझी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून दूधगावावर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: बाइक धडकली अन् सौरभ 50 फूट उंच फेकला गेला, देवीच्या मंदिरात झाडावर आदळला, LIVE VIDEO
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement