advertisement

उद्या होलाष्टकचा दुसरा दिवस! मेष राशीवर होणार मोठा परिणाम, हेल्थपासून फायनान्सपर्यंत ज्योतिषचार्यांनी सर्वच सांगितलं

Last Updated:

हिंदू धर्मशास्त्रानुसार, होळीच्या आधीचे आठ दिवस 'होलाष्टक' म्हणून ओळखले जातात. यंदा होलाष्टकाची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून झाली असून उद्या, 25 फेब्रुवारी 2026 रोजी होलाष्टकचा दुसरा दिवस आहे.

News18
News18
Holashtak Effect On Arise Zodiac : हिंदू धर्मशास्त्रानुसार, होळीच्या आधीचे आठ दिवस 'होलाष्टक' म्हणून ओळखले जातात. यंदा होलाष्टकाची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून झाली असून उद्या, 25 फेब्रुवारी 2026 रोजी होलाष्टकचा दुसरा दिवस आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, या काळात नऊ ग्रहांचे स्वरूप उग्र असते, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. प्रसिद्ध ज्योतिषचार्यांच्या मते विशेषतः मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. मेष राशीचा स्वामी 'मंगळ' सध्या कुंभ राशीत असून तो राहूच्या प्रभावाखाली आहे, ज्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आणि पुढील काळ आव्हानात्मक ठरू शकतो.
मेष राशीवर होणारे मुख्य परिणाम
स्वभाव आणि मानसिक स्थिती
मंगळ आणि राहूच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये चिडचिड आणि राग वाढण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचा संयम सुटू शकतो. मानसिक तणावामुळे तुम्ही घाईघाईत चुकीचे निर्णय घेऊ शकता. अशावेळेस योगा आणि ध्यानाचा आधार घ्या आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा विनाकारण वाद ओढवून घ्याल. ज्याचा परिणाम तुमचा नात्यांवर होऊ शकतो.
advertisement
नातेसंबंध
उद्यापासून तुमच्या संवाद शैलीत एक प्रकारचा कडवटपणा येऊ शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या जवळच्या व्यक्तींवर होईल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे. मित्रांशी असलेले संबंधही तणावाचे होऊ शकतात. जोडीदाराचे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. वादाचे मुद्दे शांततेत सोडवा. या काळात वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि जोडीदाराला समजून घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा त्याचे परिणाम तुमच्या नात्यावर होईल.
advertisement
कौटुंबिक परिणाम
कुटुंबात मालमत्ता किंवा पैशांच्या विषयावरून वादाची ठिणगी पडू शकते. भावंडांशी असलेले संबंध बिघडू शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते. घरातील अंतर्गत गोष्टी बाहेरच्या लोकांशी शेअर करू नका. या काळात कौटुंबिक गोष्टींवर अधिक लक्ष द्या. घरातील व्यक्तींसह नाते वादामुळे दुरावली जाणार नाहीत याची काळजी घ्या आणि संयम बाळगा.
advertisement
आरोग्य
होलाष्टकाच्या काळात मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत गाफील राहू नये. या 8 दिवसांत ग्रहांची स्थिती उग्र असल्याने त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल त्यामुळे या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. अपघाताची भीती असल्याने वाहन सावधगिरीने चालवावे. आहारात पाण्याचे प्रमाण वाढवा. बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
advertisement
आर्थिक
आर्थिक आघाडीवर उद्याचा दिवस 'सावध' राहण्याचा आहे. गुंतवणुकीत फसवणूक होण्याचे योग आहेत. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रांची नीट तपासणी न केल्यास नुकसान होऊ शकते. कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा मोठी खरेदी होळीपर्यंत पुढे ढकला. या काळात मोठं आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना विचार करूनच व्यवहार करा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
उद्या होलाष्टकचा दुसरा दिवस! मेष राशीवर होणार मोठा परिणाम, हेल्थपासून फायनान्सपर्यंत ज्योतिषचार्यांनी सर्वच सांगितलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement