दैनंदिन दिनचर्येमुळे आपलं शरीरच नाही तर आपलं मन देखील थकतं. आपल्याला अनेकदा या मानसिक थकव्याची लक्षणं दिसून येतात. पण त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही.
एखाद्या परिचिताचं नावं विसरणं, नेहमीची सवयीची गोष्ट विसरणं, काही कामासाठी खोलीत गेलात आणि पोहोचताच का आलो होतो हे विसरणं, अशा अनेक गोष्टी जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत घडतात आणि आपण त्यांना थकवा, झोपेची कमतरता किंवा कामाचा ताण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या घटना वारंवार घडत असतील तर मेंदूकडून येणारा तो इशारा असू शकतो.
advertisement
Haemoglobin : शाकाहारानं हिमोग्लोबिन वाढतं ? हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खास टिप्स
शरीराची काळजी घेत असताना, आपण अनेकदा आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून, मेंदू निरोगी ठेवण्याचे काही सोपे मार्ग पाहूयात.
ड्युअल टास्किंग - मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी, ड्युअल टास्किंग वापरून पाहू शकता. एकाच वेळी दोन वेगवेगळी कामं करून मेंदूला आव्हान देण्याचा हा प्रकार आहे. उदाहरणार्थ, चालताना अंक उलटे मोजा किंवा घरातील कामं करताना संगीत ऐका. यामुळे मेंदू-मज्जातंतू समन्वय सुधारतो आणि मल्टीटास्किंग सोपं होतं.
व्हिज्युअल मेमरी टेस्ट - स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी व्हिज्युअल मेमरी टेस्ट देखील फायदेशीर ठरू शकते. यासाठी, तीस सेकंदांसाठी एखाद्या चित्राकडे, खोलीकडे किंवा वर्तमानपत्राच्या पानाकडे बारकाईनं पहा. आता डोळे बंद करा आणि ती वस्तू शेवटची कुठे पाहिली होती आणि तिचा रंग कोणता होता हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं तपशीलांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
Chunking - मोठी माहिती किंवा संख्या तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, ती लहान तुकड्यांमधे विभाजित करा. उदाहरणार्थ, दहा-अंकी मोबाईल नंबर तीन-अंकी तुकड्यांमधे मोडून तो लक्षात ठेवा. ही पद्धत कार्यरत स्मरणशक्ती तीक्ष्ण करते. ही युक्ती विशेषतः विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे.
माइंडफुलनेस - मन शांत करण्याचा आणि मेंदूचं काम चांगलं व्हावं यासाठीची ही चांगली युक्ती आहे. यासाठी दिवसाच्या कोणत्याही वेळी दहा मिनिटं शांत बसायचं आहे.
Hair Care : कोरड्या केसांसाठी खास इलाज, घरी बनवता येईल असे हेअर पॅक
यासाठी, लक्ष श्वासावर केंद्रित करा. मन भटकू नये म्हणून, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा व्यायाम मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय करतो, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करणं सुधारतं.
Neuroplasticity - मन सक्रिय आणि निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काहीतरी नवीन शिकत राहणं. यासाठी, एक नवीन भाषा शिका, एखादं वाद्य वाजवण्याची कला शिका किंवा दररोज कामासाठी वेगळा मार्ग निवडा. काहीतरी नवीन करता तेव्हा मेंदूमधे नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात, वयानुसार उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांचं प्रमाण यामुळे कमी होतं.
