TRENDING:

Health Tips : दात घासताना तुम्हाला 'हा' त्रास जाणवतो का? सावध व्हा, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा..

Last Updated:

Health Problem Indication While Brushing Teeth : लोक सहसा या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे तुम्हाला काही आजारांची पूर्वसूचनाही देऊ शकते. म्हणूनच ही समस्या तुम्हाला दररोज होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ब्रश करताना मळमळ आणि उलट्या होत असल्याची तक्रार अनेक लोक करतात. मात्र लोक सहसा या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे तुम्हाला काही आजारांची पूर्वसूचनाही देऊ शकते. म्हणूनच ही समस्या तुम्हाला दररोज होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आज आम्ही तुम्हाला ब्रश करताना मळमळ आणि उलट्या होत असल्यास असे का होते आणि त्यावर उपाय काय हे सांगणार आहोत.
ब्रश करताना उलट्या होणे
ब्रश करताना उलट्या होणे
advertisement

तुम्हाला ब्रश करताना मळमळ होत असेल तर त्यामागील कारण शरीरात पित्त वाढण्यापासून ते अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. ब्रश करताना उलट्या झाल्यासारखे वाटण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. बऱ्याचदा गॅस आणि अ‍ॅसिडिटी हे देखील कारण असू शकते. तर यामागील कारणे जाणून घ्या.

ब्रश करताना उलट्या होणे हे किडनी निकामी होण्याचेदेखील लक्षण असू शकते. जेव्हा किडनी काम करू शकत नाही, तेव्हा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. किडनी निकामी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरात क्रिएटिनिनची पातळी वाढणे. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

advertisement

ब्रश करताना उलट्या होणे हे अल्सर आणि गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोगामुळे होऊ शकते. हे पोटाशी संबंधित आजारांमुळे देखील होऊ शकते. ब्रश करताना उलट्या होणे पोटातील आम्ल वाढल्यामुळे होऊ शकते, ज्यामुळे पोटाची स्थिती बिघडू शकते.

जर तुम्हाला ब्रश करताना मळमळ होत असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही लवकरच अनेक समस्यांना बळी पडू शकता. यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळेवर उपचार घ्या. जेणेकरून नंतर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : दात घासताना तुम्हाला 'हा' त्रास जाणवतो का? सावध व्हा, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल