TRENDING:

Eye Care : वायू प्रदूषणापासून डोळ्यांना जपा, डोळ्यांच्या रक्षणासाठी या टिप्स ठरतील उपयु्क्त

Last Updated:

वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर वायू प्रदूषणामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर संसर्गाचा धोका देखील कमी होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वायू प्रदूषणात झालेली प्रचंड वाढ प्रकृतीसाठी घातक आहे. यामुळे आपल्या फुफ्फुसांवरच नाही तर डोळ्यांवरही नकारात्मक परिणाम होतो.
News18
News18
advertisement

हवेतील घाण, धूळ आणि धूर यामुळे डोळ्यांना जळजळ, खाज सुटणं, डोळे लाल होणं आणि डोळ्यांतून पाणी येणं असे प्रकार होऊ शकतात. यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच, डोळ्यांचं संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे.

वायू प्रदूषणामुळे सामान्यतः डोळ्यांच्या समस्या वाढतात. डोळ्यांत जडपणा जाणवणं, दृष्टी धूसर होणं, डोळ्यांत जळजळ, लालसरपणा आणि सूज, डोळ्यांतून पाणी येणं, डोळ्यांत वारंवार खाज सुटणं असे प्रकार जाणवतात.

advertisement

वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर वायू प्रदूषणामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर संसर्गाचा धोका देखील कमी होईल.

Acidity : आम्लपित्त, जळजळ होईल कमी, या उपायांनी करा अ‍ॅसिडिटीवर मात

चष्मा किंवा गॉगलचा वापर - चष्मा किंवा गॉगल्स वापरणं हा डोळ्यांचं रक्षण करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. घाण, धूळ, धूर आणि हानिकारक किरणांपासून यामुळे डोळ्यांचं रक्षण होतं. चष्मा किंवा गॉगल वापरण्यापूर्वी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण काहींना चष्मा किंवा गॉगल वापरुन डोकं दुखण्याचा त्रास जाणवू शकतो.

advertisement

डोळ्यांची स्वच्छता - आपण बाहेर असतो तेव्हा आपले डोळे धूळ आणि धुराच्या संपर्कात येतात. म्हणून, दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने डोळे धुवा. यामुळे तुमच्या डोळ्यांतील घाण किंवा कचरा काढून टाकण्यास मदत होईल.

Face Pack : डेड स्किन काढण्यासाठी खास नैसर्गिक फेस पॅक, चेहरा येईल उजळून

Eye Drops - प्रदूषणादरम्यान डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी, Eye Drops वापरु शकता. खरेदी करण्यापूर्वी  डॉक्टरांचा सल्ला घ्या. चुकीचे Eye Drops वापरणं खूप हानिकारक असू शकतं.

advertisement

पाणी प्या - बहुतेक जण धावपळीत पुरेसं पाणी पित नाहीत. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. प्रदूषणात डोळ्यांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, नियमितपणे पाणी पिणं आवश्यक आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पवना नदीचं आरोग्य धोक्यात, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास, कारण काय?
सर्व पहा

एअर प्युरिफायर - वायू प्रदूषणापासून घराचं संरक्षण करण्यासाठी, एअर प्युरिफायर हा चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या घराची हवा स्वच्छ आणि सुरक्षित राहील.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Care : वायू प्रदूषणापासून डोळ्यांना जपा, डोळ्यांच्या रक्षणासाठी या टिप्स ठरतील उपयु्क्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल