Acidity : अॅसिडिटीचा त्रास होतोय ? जळजळ लगेच कमी करण्यासाठी हे पाच उपाय लक्षात ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पोटाची जळजळ त्वरित कमी करण्यासाठी आणि अल्सरसारख्या समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात. दही, मनुका, मध, केळी, ज्येष्ठमध यामुळे पोटातली जळजळ लगेच कमी होते.
मुंबई : जेवणानंतर लगेच जळजळ, आंबट ढेकर येणं किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर ही आम्लपित्ताची लक्षण आहेत. आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप किंवा जास्त ताण यामुळे पोटाच्या समस्या वाढतायत.
पोटाची जळजळ त्वरित कमी करण्यासाठी आणि अल्सरसारख्या समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात. डॉ. शालिनी सिंग सोलंकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओत या पाच गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामुळे आम्लपित्त लगेच कमी होईल
मनुका मध - मनुका मध पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यातल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. अल्सर बरे करण्यास देखील याची मदत होते. मधामुळे छातीतली जळजळ आणि आम्लता या दोन्हीपासून आराम मिळतो.
advertisement
कोबीचा रस - कोबीत आढळणारे ग्लूटामाइन हे संयुग पोटाच्या आतील आवरणाची दुरुस्ती करतं. आम्लामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हा घटक उपयुक्त आहे. अल्सर बरे करण्यास देखील याचा उपयोग होतो.
दही - दह्यात नैसर्गिक प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना यामुळे बळकटी मिळते. यामुळे पचन सुधारतं आणि आम्लपित्त कमी होतं. जेवणानंतर एक वाटी ताजं दही किंवा ताक हे खूप प्रभावी उपाय आहे.
advertisement
ज्येष्ठमध - ज्येष्ठमधात ग्लायसिरायझिन नावाचं संयुग असतं, पोटातील आम्लामुळे होणारी जळजळ यामुळे कमी होते. ज्येष्ठमध चघळल्यानं किंवा त्याचा रस प्यायल्यानं पोट थंड होतं आणि जळजळ कमी होते. अल्सरच्या रुग्णांसाठी देखील ते फायदेशीर मानलं जातं.
केळी - केळ्यांमधील सायटोएंडोक्राइन पेशी पोटात एक संरक्षणात्मक थर तयार करतात, ज्यामुळे आम्लाला पोटाच्या अस्तराचं नुकसान होण्यापासून रोखलं जातं. केळ्यांमुळे त्वरीत आराम मिळतोच पण आतड्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठीही केळी उपयुक्त आहेत.
advertisement
अॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल तर आहाराचा आणि जीवनशैलीत काही बदलांची गरज आहे का याचा विचार करा. मसालेदार, तळलेले पदार्थ खाणं टाळा तसंच बराच वेळ उपाशी राहणं टाळा. वर उल्लेख केलेल्या या पाच नैसर्गिक गोष्टींमुळे औषधांशिवायही पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Acidity : अॅसिडिटीचा त्रास होतोय ? जळजळ लगेच कमी करण्यासाठी हे पाच उपाय लक्षात ठेवा


