TRENDING:

Sleep Banking : स्लीप बँकिंग ट्रेंड का होतो व्हायरल ? झोपेचा साठा करणं खरंच शक्य आहे का ? साठवलेली झोप वापरता येते ?

Last Updated:

झोपेबद्दलचा एक ट्रेंड सध्या व्हायरल होतोय. तो म्हणजे स्लीप बँकिंग. कुठल्याही कामांमुळे येणारे काही दिवस व्यस्त जाणार असतील तर झोपण्यासाठी कमी वेळ असतो. म्हणून आधी झोपेचा साठा करायचा. अमेरिकेमधे 'स्लीप बँकिंग' नावाचा एक ट्रेंड वेगानं वाढतोय. पुरेशी झोप घेण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी लोक हा ट्रेंड स्वीकारत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : झोप म्हणजे शरीराच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी महत्त्वाची वेळ. रात्री झोप आली की झोपणं वेगळं पण झोप पूर्ण झाली नाही की थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण झाली असेल तर फ्रेश वाटतं.
News18
News18
advertisement

झोपेबद्दलचा एक ट्रेंड सध्या व्हायरल होतोय. तो म्हणजे स्लीप बँकिंग. कुठल्याही कामांमुळे येणारे काही दिवस व्यस्त जाणार असतील तर झोपण्यासाठी कमी वेळ असतो. म्हणून आधी झोपेचा साठा करायचा. अमेरिकेमधे 'स्लीप बँकिंग' नावाचा एक ट्रेंड वेगानं वाढतोय. पुरेशी झोप घेण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी लोक हा ट्रेंड स्वीकारत आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं तर, स्लीप बँकिंग म्हणजे येणाऱ्या व्यस्त दिवसात थकवा येऊ नये म्हणून आधीच अतिरिक्त झोपेचा साठा करणं. स्लीप बँकिंग म्हणजे काय आणि ते तुम्हाला खरोखर फायदेशीर ठरू शकते का ते जाणून घेऊया.

advertisement

तुम्हाला माहित असेल की नजीकच्या काही दिवसात झोप कमी होईल, तर तुम्ही काही दिवस आधी अतिरिक्त झोप घेऊन तुमचं शरीर तयार करू शकता असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेतील वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चमधे केलेल्या अभ्यासानंतर ही संकल्पना प्रचलित झाली. संशोधक ट्रेसी रुप यांच्या टीमनं यासाठी चोवीस सैनिकांचा अभ्यास केला. त्यांना असं आढळून आलं की व्यस्त दिवसांपूर्वी जास्त झोप घेणाऱ्या सैनिकांमधे जागरूकता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नसलेल्या सैनिकांपेक्षा चांगली होती.

advertisement

Obesity : भारतासाठी धोक्याचा इशारा, कोट्यवधी मुलं काळजी वाटावी इतकी लठ्ठ

या स्लीप बँकला समजून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी अनेक गटांवर अभ्यास केला. त्यातले संशोधन निष्कर्ष पाहूया-

सैनिकांवर परिणाम: अभ्यासात, एका गटाला दहा तास आणि दुसऱ्या गटाला सात तास झोप देण्यात आली. नंतर, जेव्हा दोन्ही गटांची झोप खूपच कमी झाली, तेव्हा दहा तास झोपलेले सैनिक अधिक उत्साही आणि मानसिकदृष्ट्या सतर्क असल्याचे आढळून आलं.

advertisement

डॉक्टर आणि नाईट शिफ्ट - मियामी रुग्णालयातील डॉक्टरांच्या 2023 च्या अभ्यासानुसार, रात्रीच्या शिफ्टपूर्वी तीन दिवस नव्वद मिनिटं जास्त झोपल्यानं त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारली

खेळाडूंची कामगिरी - टेनिस, बास्केटबॉल आणि रग्बी खेळाडू काही आठवड्यांसाठी दिवसातून 9-10 तास झोपत असत तेव्हा त्यांच्या मैदानावरील कामगिरीत लक्षणीय वाढ झाली.

तज्ज्ञांच्या मते, स्लीप बँकिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला खूप बदल करण्याची आवश्यकता नाही. येत्या काही दिवसांत तुम्हाला कमी झोप मिळणार हे माहित असेल तर -

advertisement

एक किंवा दोन आठवड्यांपासून दररोज तीस ते साठ मिनिटं जास्त झोपायला सुरुवात करा.

लवकर झोपून किंवा सकाळी थोडं उशिरा उठून हे कव्हर करू शकता.

दिवसा एक छोटीशी झोप घेणं देखील फायदेशीर आहे, पण ती 45 मिनिटांपेक्षा जास्त नसावी याची खात्री करा.

Metabolism : कितीही कमी खाल्लं तरी वजन जैसे थे ? जाणून घ्या कारणं आणि उपचार

झोप का महत्त्वाची ?

झोप ही फक्त विश्रांतीसाठी नाही. दिवसभर आपल्या शरीरात आणि मनात साचणारा कचरा झोपेच्या वेळी साफ केला जातो. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हाच ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सक्षम असतं असं न्युरोलॉजिस्ट मायकेल हॉवेल यांनी स्पष्ट केलंय.

झोप खरोखर साठवता येते का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा लेक अधिकारी, क्लासेसचा आधार न घेता मिळवलं यश, UPSC परीक्षेत 434 रँक
सर्व पहा

sleep banking trend खूप लोकप्रिय होत असला तरी, काही शास्त्रज्ञ याच्याशी असहमत आहेत. जास्त झोप साठवता येत नाही, कारण जर शरीर थकलं नसेल तर जास्त झोप घेणं अशक्य आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep Banking : स्लीप बँकिंग ट्रेंड का होतो व्हायरल ? झोपेचा साठा करणं खरंच शक्य आहे का ? साठवलेली झोप वापरता येते ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल