TRENDING:

लठ्ठ व्यक्तीसोबत राहून दुसरी व्यक्तीही होतेय लठ्ठ, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

Obesity news : संशोधनात आढळलं की सुमारे 20% घरांमधील सर्व प्रौढ व्यक्ती जास्त वजनाचे होते. त्याच वेळी 10% घरांमध्ये सर्व प्रौढ व्यक्ती लठ्ठ होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजकाल लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार भारतात कुटुंबांचं एकत्रित वजन वाढत असल्याचं दिसून आलं आहे. 10 पैकी 2 कुटुंबांमध्ये सर्व प्रौढ व्यक्ती एकतर जास्त वजन किंवा लठ्ठ असतात. संशोधनात आढळलं की सुमारे 20% घरांमधील सर्व प्रौढ व्यक्ती जास्त वजनाचे होते. त्याच वेळी 10% घरांमध्ये सर्व प्रौढ व्यक्ती लठ्ठ होते.
News18
News18
advertisement

NICPR, TERI स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज अँड सिम्बायोसिसच्या संशोधकांनी हे सर्वेक्षण केलं. त्यांनी 6 लाखांहून अधिक घरांमधील लोकांच्या वजन आणि लठ्ठपणाबद्दल माहिती गोळा केली.

अभ्यासात असं आढळून आलं की मणिपूर, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या राज्यांमध्ये 30% पेक्षा जास्त कुटुंबांमध्ये सर्व प्रौढांचं वजन जास्त होतं. तामिळनाडू आणि पंजाबमध्ये पाचपैकी दोन कुटुंबांमध्ये सर्व प्रौढांचं वजन जास्त होतं. शहरांमध्ये गावांच्या तुलनेत दुप्पट कुटुंबांमध्ये सर्व सदस्य लठ्ठपणाने ग्रस्त होते.

advertisement

बर्थडेला असतो मृत्यूचा जास्त धोका? संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती

कुटुंबाचं एकत्रित वजन वाढतंय

या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कुटुंबांचं एकत्रित वजन वाढत आहे. आयसीएमआर-एनआयसीपीआरचे प्रमुख संशोधक प्रशांत कुमार सिंह म्हणाले की, जेव्हा कुटुंबातील एका सदस्याचं वजन जास्त असतं किंवा तो लठ्ठ असतो तेव्हा इतरांचेही लठ्ठ होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, लठ्ठपणा रोखण्यासाठी केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा की जर घरातील एक व्यक्ती लठ्ठ असेल तर इतर सदस्यांनाही लठ्ठ होण्याचा धोका असतो. म्हणून संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

advertisement

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार आयसीएमआर-एनआयसीपीआरच्या संचालिका शालिनी सिंह म्हणाल्या की, कौटुंबिक स्थूलता हा एक मोठा बदल आहे. आता आपण स्थूलतेला वेगळ्या पद्धतीने समजून घेत आहोत. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कुटुंब हे या आरोग्य समस्येचे केंद्र आहे. म्हणजेच, स्थूलता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर संपूर्ण कुटुंबाची समस्या आहे.

advertisement

भयंकर आहे सलमान खानला झालेला आजार, वेदना इतक्या की जिवतंपणी येतात मरणयातना

या अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की लठ्ठपणा असलेल्या कुटुंबातील लोकांना अनेक असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. आपल्याला आधीच माहित आहे की लठ्ठपणा हा हृदयाच्या खराब आरोग्याचं लक्षण आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकार यासारखे अनेक आजार होऊ शकतात. याचा संबंध 13 प्रकारच्या कर्करोगाशी देखील आहे. म्हणून, लठ्ठपणा टाळणं खूप महत्त्वाचं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडे लक्ष दिलं पाहिजे. नियमित व्यायाम करणं आणि निरोगी अन्न खाणं खूप महत्त्वाचं आहे. जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र प्रयत्न केले तर लठ्ठपणा सहज टाळता येतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लठ्ठ व्यक्तीसोबत राहून दुसरी व्यक्तीही होतेय लठ्ठ, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल