भयंकर आहे सलमान खानला झालेला आजार, वेदना इतक्या की जिवतंपणी येतात मरणयातना
- Published by:Priya Lad
Last Updated:
Salman khan trigeminal neuralgia : सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार आहे. 'द कपिल शर्मा शो' मध्ये सलमानने पहिल्यांदाच अगदी स्पष्टपणे याबाबत सांगितलं.
नवी दिल्ली : अभिनेता सलमान खान, वयाच्या साठीत पोहोचला तरी त्याच्या चाहतींची कमी नाही, कित्येक तरुणी आजही त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात. दबंग अशी ओळख असलेला सलमान खान गेली कित्येक वर्षे एका आजाराशी लढा देतो आहे. हा आजारही साधासुधा नाही. हा आजार इतका भयंकर आहे, की यामुळे होणाऱ्या वेदना म्हणजे मरणयातना. या आजाराच्या वेदना इतक्या असह्य असतात की रुग्ण मृत्यूच मागेल. या आजाराबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार आहे. 'द कपिल शर्मा शो' मध्ये सलमानने पहिल्यांदाच अगदी स्पष्टपणे याबाबत सांगितलं. तो म्हणाला, "मी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराशी झुंज देतोय. ज्यामुळे तोंडात तीव्र वेदना होतात. एवढंच नाही तर माझ्या मेंदूमध्ये अॅन्युरिझम आहे आणि AVM (अर्जिओव्हेनस मॅलफॉर्मेशन) वरही उपचार सुरू आहेत."
advertisement
या आजारामुळे सलमानला चालणं, बोलणं, इतर सामान्य कृती करणंही अवघड जातं. तरीसुद्धा सलमान काम करत आहे, स्टंट्स करतो, डान्स करतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहतो. त्याने म्हटलं, “वेदना असल्या तरी शो थांबू देऊ नये, असं मी मानतो.”
आता ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आणि कारणं काय हे जाणून घेण्याची इच्छा तुमचीही असेल.
advertisement
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?
ट्रायजेमिनल नर्व्ह ही मज्जातंतू मानवी शरीरात चेहरा आणि मेंदू यांच्यामध्ये संदेशवाहक म्हणून काम करते. म्हणजेच, ती चेहऱ्यावरून मेंदूला वेदना, स्पर्श आणि तापमानाशी संबंधित संवेदना पाठवते. जर ट्रायजेमिनल नर्व्हवर दबाव आला किंवा ती खराब होऊ लागली, तर ट्रायजेमिनल नर्व्हची स्थिती उद्भवते. ज्याला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणतात.
advertisement
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या आजारामुळे खूप वेदना होतात. वेदना इतकी असह्य आहे की दात स्वच्छ करतानाही त्रास होतो. चेहऱ्याची त्वचा इतकी संवेदनशील होते की त्याला स्पर्श केल्यानेही विजेचा झटका येतो. आरोग्य तज्ञांच्या मते, ट्रायजेमिनल नर्व्ह हा एक प्रकारचा जुनाट वेदना आजार आहे. त्याचे कारण अद्याप सापडलेलं नाही.
Location :
Delhi
First Published :
June 22, 2025 3:32 PM IST