अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची कितीतरी प्रकरणं आहेत. पण तज्ज्ञांच्या मते हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात काही लक्षणं दिसतात. ही लक्षणं पुरुष आणि महिला दोघांमध्येही वेगवेगळी असू शकतात. अशी काही लक्षणं आहेत जी फक्त महिलांमध्येच दिसून येतात. जर ही लक्षणं महिलांमध्ये सतत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. महिलांमध्ये हृदयविकाराची कोणती लक्षणं आहेत. याबाबत जीबी पंत हॉस्पिटल दिल्लीच्या वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरिमा निगम याबद्दल न्यूज18 ला याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
फक्त महिलांमध्ये दिसणारी हृदयविकाराची 6 लक्षणं
मान आणि जबड्यात वेदना : हृदयविकाराचा झटका सहसा छाती किंवा डाव्या हाताच्या वेदनांशी संबंधित असतो, परंतु हृदयविकाराच्या झटक्यात महिलांना पाठ, मान, जबडा आणि हातांमध्येही वेदना होऊ शकतात. ही वेदना तीव्र किंवा सतत असू शकते.
थंड घाम : अनेकदा असं दिसून येतं की महिलांना हृदयविकाराचा झटका आल्यावर थंड घाम येतो. तथापि, कधीकधी अशी परिस्थिती तणावामुळे देखील उद्भवू शकते. अशा परिस्थितीत जर कोणासोबत असं घडलं तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
अनावश्यक थकवा : अनेक महिलांमध्ये विश्रांती असूनही थकवा येणं हेदेखील हृदयविकाराचं कारण बनतं. म्हणून जर हे कोणत्याही महिलेसोबत घडलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
श्वास घेण्यास त्रास : श्वास घेण्यास त्रास होणं आणि चक्कर येणं ही हृदयविकाराची सर्वात सामान्य लक्षणं आहेत. तज्ञांच्या मते, या काळात असं वाटतं की तुम्ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. चालतानाही असहाय्य वाटतं.
पोटदुखी : बहुतेक लोक तीव्र पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित आजार अन्न विषबाधा, फ्लू किंवा छातीत जळजळ यांच्याशी जोडतात. पण जर पोटात किंवा आजूबाजूला असामान्य दाब असेल तर हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
छातीत अस्वस्थता : जर तुम्हाला छातीत वेदना, अस्वस्थता, जळजळ आणि दाब जाणवत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. काही महिलांमध्ये, वेदना फक्त छातीच्या डाव्या बाजूला नसून संपूर्ण छातीत असते.