मालक दारीयस दोराबजी सांगतात की, या रेस्टॉरंटची सुरुवात माझ्या पणजोबांनी 1878 साली केली होती. त्या काळात भारतात रेस्टॉरंट्स ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. ब्रिटिश आणि इंग्लिश ऑफिसर्स पुण्यात येत असत आणि त्यांच्यासाठी चहा आणि बनमस्का सर्व्ह करणे यापासून या रेस्टॉरंटची सुरुवात झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहून, सहा महिन्यांनी पूर्ण जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी फूडसाठी विशेष मागणी होती आणि त्यामुळे पारशी जेवणांची सुरुवात झाली.
advertisement
चॉकलेट आईस्क्रीम ब्राऊनी, उन्हाळ्यात शरिरासाठी एकदम थंडगार, संपूर्ण रेसिपी Video
आजही येथे पारंपरिक पारशी पदार्थ जसे की धनसाक, पुलाव, चिकन, बिर्याणी आणि माशांचे पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ कोळशावर बनवले जातात, त्यामुळे त्यांच्या चवीलाही एक खास पारंपरिक झणझणीतपणा असतो. या रेस्टॉरंटमध्ये आजही पारंपरिक पद्धती जपल्या जातात, असं दारीयस दोराबजी सांगतात.
दोराबजी अँड सन्स हे केवळ एक रेस्टॉरंट नसून, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. 19 व्या शतकापासून ते आजपर्यंत सातत्याने खाद्यप्रेमींचं मन जिंकत आलं आहे. पारशी संस्कृतीची चव आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण असलेलं हे ठिकाण अनेक जणं आवडीनं भेट देतात, असंही दारीयस दोराबजी यांनी सांगितले.