शहरातील अक्षय बाहेती यांनी वयाच्या 18 वर्षांपासून रक्तदान करायला सुरुवात केली. रक्तदान करायची प्रेरणा ही त्यांना त्यांच्या मित्राचा जेव्हा अपघात झाला तेव्हा मिळाली. जेव्हा त्यांच्या मित्राचा अपघात झाला तेव्हा त्यांना रक्तासाठी खूप फिरावे लागलं पण रक्त हे भेटत नव्हतं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा रक्तदान करायचं. तेव्हा त्यांचं वय हे 17 वर्षे होते. जेव्हा ते 18 वर्षांचे झाले तेव्हापासून त्यांनी रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्यांनी 62 वेळापेक्षा जास्त रक्तदान हे केलेलं आहे.
advertisement
अक्षय यांच्या नावावर कमी वयात विश्वविक्रम करण्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 31 वर्षांत 50 वेळा रक्तदान केल्याची नोंद झाली आहे. तर, वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये थालेसिमिया रुग्णांसाठी सर्वाधिक 58 वेळा रक्तदान केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याच्या या कार्यामुळे त्याला युनायटेड रिसर्च कौन्सिल (USA) तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं प्रशस्तीपत्रक देण्यात आलेलं आहे.
मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी रक्तदान हे करायला हवं. कारण की यामुळे तीन जणांचा जीव वाचू शकतो. मी विशेष करून थालेसिमिया रुग्णांसाठी रक्तदान करतो कारण की त्यांना महिन्यातून पंधरा दिवसांतून एकदा पूर्ण रक्त आहे बदलावं लागतं. आणि त्यामुळे मी महिन्याला एकदा रक्तदान करत असतो. तर आपण देखील रक्तदान करायला हवं, असं अक्षय यांनी सांगितलं आहे.