कल्याण : बिर्याणी हा सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ. देशभरात टॉप 10 मधील सर्वाधिक पसंतीचा खाद्यपदार्थ म्हणून बिर्याणीचा नंबर लागतो. तरुणाईच्या मनातला सर्वात आवडता खाद्यपदार्थ देखील बिर्याणीच आहे. अशीच कल्याणमधील फेमस बिर्याणी म्हणजे 'बिर्याणी मोमेंट्स' ची बिर्याणी खवय्यांची मन जिंकून घेत आहे. ही बिर्याणी खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी असते.
advertisement
कोणी केली सुरुवात?
पूजा गीता बराई आणि बबिता बराई या दोन बहिणींनी बिर्याणी मोमेंट्सची कल्याणमध्ये सुरुवात केली. पूजा आणि बबिता या दोन सख्या बहिणी. स्वयंपाकात आधीपासूनच रुचकर होत्या. सुरुवातील वाढदिवस, छोटे समारंभ यांसाठी बिर्याणीची ऑर्डर त्यांना येतं. पुढे हळहळू बिर्याणीची मागणी वाढू लागली आणि बिर्याणी मोमेंट्सची स्थापना त्यांनी केली.
आता ब्रेडशिवाय बनवा हेल्दी सँडविच, रव्याची सोपी रेसिपी माहितीये का?
कोण कोणत्या मिळतात बिर्याणी?
चिकन दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, मलई बिर्याणी, व्हेजमध्ये पनीर बिर्याणी, अवधी बिर्याणी त्यांच्या लोकप्रिय आहेत. साधारण 120 रुपये हाल्फप्लेट ते 200 रुपये फुल प्लेट असे त्यांचे दर आहेत. फॅमिली पॅक 600 रुपये त्यात चार ते पाच लोक आरामात खातात. बिर्याणीची चव रुचक असल्याने अनेक लोक यांच्या बिर्याणीलाच पसंती देतांना दिसतात.
नाश्त्याला बनवा रवा हांडवो डिश, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल,PHOTOS
आम्ही दोघी गृहिणी असल्याने घरातील सगळी काम करुन मग आउटलेटमध्ये यावं लागतं. घरातील काम आणि व्यवसाय हे दोघेही सांभाळतांना तारेवरची कसरत होते. आम्ही दोघांनी कामे वाटून घेतल्याने कामचं नियोजन योग्य रीतीने हाताळतो. अडचणी आहेतच पण त्यातून मार्ग काढत पुढे जातो, असं बराई बहिणी म्हणाल्या.
पेट्रोल पंपावरील कामगार कसा बनला उद्योजक? सोलापुरी चटणीला परदेशातून मागणी
बिर्याणी मोमेंट्सला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जायचं ठरवलं आहे. जेवढी मेहनत घ्याला लागले तेवढी घेऊ आणि पुढे जाऊ असा आत्मविश्वास बबिता बराई यांनी व्यक्त केला.