फरिदाबाद : आता बाहेर कडाक्याचं ऊन पडतं. दुपारी घराबाहेर पडणंही अवघड होतं, चालतानासुद्धा धाप लागते. अशात आपण फळांचा रस पिऊन घसा ओला करतो. परंतु अनेकजण कोल्डड्रिंक पितात. या पॅक्ड ज्यूसमुळे घशाला तेवढ्यापुरतं हायसं वाटू शकतं पण शरिराचं मात्र नुकसान होतं. कारण या ज्यूसमध्ये फळांचा ताजेपणा नाही, तर बनावट गोडवा आणि रंग असतो.
advertisement
डॉक्टर सेजल रस्तोगी सांगतात की, पॅक्ड ज्यूस प्रचंड गोड असतात, त्यामुळे शरिराचं नुकसान होतं. या ज्यूसमधून विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींच्या शरिरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे स्थूलपणा येण्याची शक्यता असते. सर्वात घातक म्हणजे यातून पोषक तत्त्व काहीच मिळत नाहीत, फक्त वजन वाढतं.
(किती...बारीक झालीस, सगळे हेच विचारतात? आता वजन वाढवूनच दाखवा, तेही महिन्याभरात!)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फळं आणि भाज्यांच्या तुलनेत या पॅक्ड ज्यूसमधून वजन झपाट्याने वाढतं. कारण ते रिफाइंड साखरेपासून बनवलेलं असतं. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी हे ज्यूस धोकादायक ठरू शकतं. जरी या पॅक्ड ज्यूसवर शुगर फ्री लिहिलेलं असलं तरी ते पिऊ नये, कारण त्या ज्यूसला कृत्रिम रंग येण्यासाठी बरीच प्रक्रिया केलेली असते जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
('हे' पदार्थ खा! कोलेस्ट्रॉल महिन्याभरात होईल कमी, वाढल्यास येऊ शकतो Heart attack)
दरम्यान, उन्हाळ्यात गारवा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त ताजी फळं खावी, फळांचा ताजा रस प्यावा, लस्सी प्यायली तरी उत्तम. शिवाय ताक प्यायल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि ऍसिडिटी कमी होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा