या वाड्याचा इतिहास तब्बल 100 वर्षांचा आहे आणि याच वाड्यात सौरभ मालपाणी यांनी आंबो नावाने ब्रँड सुरु केला आहे. मागील सात वर्षांपासून ते देवगड हापूस आंब्याची विक्री करत असून ह्या आंब्याचा उपयोग करून नैसर्गिक पद्धतीने मस्तानी आणि आईस्क्रीम तयार केले जात आहे. खास बाब म्हणजे या मस्तानी किंवा आईस्क्रीममध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत.
advertisement
Summer Tips : पाणी होईल बर्फासारखं गार, फ्रीजचीही गरज नाही, शून्य रुपयाचा भारी जुगाड
सौरभ मालपाणी यांच्या मते, देवगड हापूस आंब्यापासून बनलेली मस्तानी आणि आईस्क्रीम भारतात पहिल्यांदाच त्यांनीच तयार केली आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाला पुणेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुन्या वाड्याच्या परंपरेतील अनोख्या वातावरणात ही मस्तानी खाण्याचा अनुभव हा खवय्यांसाठी संस्मरणीय ठरतो.
या मस्तानीची किंमत 180 रुपये आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे, या मस्तानीमध्ये देवगड हापूसचा शेक, त्यावर देवगड हापूस आईस्क्रीम आणि शेवटी वरून ताज्या हापूसच्या फोडी टाकून हे स्वादिष्ट मस्तानी तयार केली जाते.
उन्हाळ्यात ताजेपणाचा अनुभव देणारी आणि 100 वर्षाच्या ऐतिहासिक वाड्याची छाप मनावर उमटवणारी ही मस्तानी सध्या पुण्यातील खाद्यप्रेमींसाठी एक आकर्षण ठरत आहे.