TRENDING:

Famous Food Mumbai: पास्ता ते पिझ्झा, फक्त 29 रुपयांपासून चाखा चव, हे आहे दहिसरमधील बेस्ट फूड स्पॉट, Video

Last Updated:

अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. इथे 29 रुपयांपासून 199 रुपयांपर्यंत उत्तम दर्जाचे आणि चवदार पदार्थ मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. जर तुम्हाला स्वस्तात मस्त इटालियन आणि कॉन्टिनेंटल पदार्थ चाखायचे असतील, तर दहिसर पूर्वेला असलेल्या केजेस किचन या फूड स्पॉटला नक्की भेट द्या. इथे 29 रुपयांपासून 199 रुपयांपर्यंत उत्तम दर्जाचे आणि चवदार पदार्थ मिळतात.
advertisement

दहिसर पूर्व रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी सँडविच, पास्ता, मसाला मॅगी, मोमोज, ग्रीन राईस, बाऊल राईस, पिझ्झा यांसारख्या विविध इटालियन आणि कॉन्टिनेंटल डिशेस अतिशय किफायतशीर दरात मिळतात. कॉलेज तरुणाईपासून ते ऑफिसमधील कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण म्हणजे चविष्ट आणि बजेट-फ्रेंडली पर्याय ठरत आहे.

advertisement

Tourist places in Nashik: पावसाळ्यात नाशिकमधील इथं नाही फिरला तर कुठे फिरला! 5 Hidden ठिकाणं

कीर्ती जामखेडकर यांनी हा फूड बिझनेस सुरू केला आहे. गेली 10 ते 12 वर्षे त्या आयटी क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. पण कोणतेही क्षेत्र  असो तिथे स्पर्धा असतेच. पण कीर्ती यांनी स्पर्धेतून बाहेर पडत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात कुणीही व्यवसाय करत नव्हते, पण त्यांनी धाडस केले आणि सर्वसामान्यांना परवडेल असा खाद्य व्यवसाय सुरू केला.

advertisement

केजेस किचनमध्ये मिळणारे पदार्थ 

1) 6 प्रकारचे पिझ्झा

2) हेल्दी गार्लिक ब्रेड 

3) पिंक सॉस पास्ता ते  मशरूम पास्ता असे वेगवेगळे प्रकार 

4) राईस बाऊल 

4) मोकटेल 

5) फ्राईज 

शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य ग्राहकांना लक्षात घेऊन त्यांनी इटालियन आणि कॉन्टिनेंटल डिशेस देण्यास सुरुवात केली, आणि त्यांच्या चविष्ट प्रयोगांना भरभरून यश मिळाले.

advertisement

आज केजेस किचन हे नाव मुंबईत हळूहळू खवय्यांच्या मनात घर करत आहे. स्वस्त, चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची हवी असेल, तर एकदा इथे नक्की भेट द्या

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Food Mumbai: पास्ता ते पिझ्झा, फक्त 29 रुपयांपासून चाखा चव, हे आहे दहिसरमधील बेस्ट फूड स्पॉट, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल