येथील लाडू, चकल्या, चिवडा, करंज्या, नानखटाई अशा पारंपरिक पदार्थांमध्ये घरगुती चव आणि शुद्धतेचा विश्वास असतो. बेसनाचे शुद्ध तूपातले लाडू केवळ 800 रुपये किलो, हाताने बनवलेल्या करंज्या 200 रुपये पाव किलो, तर नायलॉन, मका, कोथिंबीर आणि पापड अशा चार प्रकारचा चिवडा प्रत्येकी 120 रुपये पाव किलो दराने मिळतो. शिवाय, ज्वारी, बाजरी, मका आणि मुगाच्या चकल्यांसह विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांची चव येथे अनुभवता येते.
advertisement
Diwali Shopping :1600 रुपयांचा ड्रेस फक्त 500 रुपयांत, दिवाळीसाठी करा मनसोक्त खरेदी, हे आहे लोकेशन
फराळासोबतच येथे A1 दर्जेदार आणि ऑर्गेनिक ड्रायफ्रूट्सही सहज मिळतात. ग्राहकांच्या सोयीसाठी ‘समर्थ ड्रायफ्रूट्स’ फ्री होम डिलिव्हरीची सुविधा देखील पुरवते. विशेष म्हणजे कंपन्यांसाठी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी दिवाळी कॉर्पोरेट गिफ्ट हॅम्पर्स सुद्धा येथे आकर्षक पद्धतीने कस्टमाइज करून दिले जातात. स्वच्छता, चव, दर्जा आणि विश्वास या सर्व गोष्टी आता एकाच ठिकाणी मिळणार आहेत, असे समर्थ ड्रायफ्रूट्सचे ओनर सांगतात.