छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंक्य गायकवाड या तरुणाने सेवा बिर्याणी हाऊस सुरू केले. या बिर्याणी हाऊससाठी दिवसभरात 180 किलो चिकन लागते तसेच तांदूळ 170 किलोंच्या जवळपास लागतात. भाकरीसाठी ज्वारी-बाजरीचे पीठ 70 किलोपर्यंत लागते. या बिर्याणी हाऊसच्या माध्यमातून महिन्याला 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. तसेच त्यांच्याकडे 25 कामगार आहेत त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे किचनची कामे स्वतः करत असल्याचे अजिंक्य सांगतो.
advertisement
Women Success Story: छोट्या स्टॉलपासून सुरूवात, आज वडापाव सेंटर, महिलेची महिन्याला 1 लाख कमाई
महिन्याची कमाई 3 लाख
सेवा बिर्याणी हाऊस येथे मिळणाऱ्या चिकन थाळीत चिकनचे 4 पीस, चिकन सूप आणि 1 बॉईल अंडे असते. तसेच ग्रेव्ही, बाजरी भाकरी, तंदूर हे अनलिमिटेड असते. या थाळीची किंमत 160 रुपयांपर्यंत असते. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी जेवणासाठी मोठी गर्दी करत असतात. या बिर्याणी हाऊसची दररोज 1 लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत असते. तसेच या ठिकाणी 5 महिला आणि इतर कामगार असे एकूण 25 जण काम करतात. त्यांना देखील चांगला रोजगार या कामाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. सर्व खर्च वजा करून महिन्याकाठी 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो, असे गायकवाड सांगतात.
अजिंक्यचा सल्ला
विशेष म्हणजे बिर्याणी हाऊसमध्ये ग्रेव्ही बनवणे, बिर्याणी तयार करणे, ही किचनची कामे स्वतः सेवा बिर्याणी हाऊसचे अजिंक्य गायकवाड करतात. तरुण मंडळींनी बिर्याणी हाऊस किंवा नवीन व्यवसायात यायचे म्हटलं तर सर्व गोष्टी आपण अगोदर शिकल्या पाहिजे. बिर्याणी बनवणे, ग्रेवी बनवणे ही कामे स्वतः केली तर कामगारांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. तेव्हा हा व्यवसाय पूर्ण काळासाठी टिकू शकतो. तसेच जिद्द आणि सकाळी उठल्यापासून मेहनत करण्याची तयारी ठेवली तर नक्कीच या व्यवसायात यश मिळते, असे देखील गायकवाड यांनी सांगितले आहे.