1923 साली सुरू झालेलं हे कोल्ड्रिंक हाऊस आजही जुन्या चवीनं आणि विश्वासानं चालत आहे. पुण्यातील बुधवार पेठ इथे असलेलं गुजर कोल्ड्रिंक हाऊस 100 वर्ष जुनं असून मलाई फालुदा आणि बाजीराव मस्तानी हा इथला प्रसिद्ध आहे. यासोबतच मस्तानी आणि आईस्क्रीमचे इतर प्रकार देखील मिळतात.
Summer Recipe : बघताच तोंडाला सुटेल पाणी, चविष्ट अशी कैरीची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
थंड दूध, फ्रूट सिरप, ड्रायफ्रूट्स आणि आईस्क्रीम यांच्या अनोख्या मिश्रणातून तयार होणारी मस्तानी केवळ एक पेय न राहता, पुणेकरांच्या आठवणींशी जोडलेली एक खास भावना आहे. यामागची गोष्ट अशी की, लोक हे पेय प्यायल्यानंतर मस्त आहे, अशी प्रतिक्रिया द्यायचे, त्यामुळेच त्याचे नाव मस्तानी पडलं.
गुजर कोल्ड्रिंक हाऊसने आजही पारंपरिक चव आणि दर्जा टिकवून ठेवला असून इथे बाजीराव मस्तानी, पिस्ता मस्तानी, मँगो मस्तानी, चॉकलेट मस्तानी, अमेरिकन ड्रायफ्रूट मस्तानी, गुलकंद मस्तानी अशा 30 ते 35 प्रकारच्या मस्तानी उपलब्ध आहेत. खास ऑरेंज आणि पायनॅपल फ्लेवर आईस्क्रीमसह ही मस्तानी बनवली जाते. किंमत 60 रुपयांपासून सुरू होते.
मलाई फालुदा हे देखील इथले एक प्रसिद्ध आकर्षण आहे. आज या कोल्ड्रिंक हाऊसच्या तीन शाखा पुण्यात कार्यरत असून, व्यवसायाची धुरा आता तिसऱ्या पिढीकडे आहे, अशी माहिती बाळासाहेब कराड यांनी दिली आहे.





