मखाने खाण्याचे फायदे
मखाने खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मखाना खाण्याचा फायदा होतो. या मखान्यांत भरपूर कॅल्शियम असतं आणि ते शरीरासाठी आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ते वाढत्या वयात असतील तर त्यांना किमान दररोज दहा ते वीस ग्राम मखाने खायला द्यायला पाहिजेत. तसंच वयात येणाऱ्या मुलींनाही मखाने खायला दिले पाहिजेत. त्याचा त्यांना खूप फायदा होतो. त्याचबरोबर ज्या महिलांची मासिक पाळी जाणार आहे. त्यांना कॅल्शियमची आवश्यकता असते जर त्यांनी दररोज मखाने खाल्ले तर त्यांना या मखाण्यामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटतं, असं कर्णिक सांगतात.
advertisement
चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी करा 'हे' उपाय, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
मखाने खायचे कसे?
मखाने वेगवेगळ्या पद्धतीनं खाता येऊ शकतात. छान ड्राय रोस्ट करून ते खाऊ शकता किंवा ते तळून त्यांना बारीक करून त्यामध्ये गूळ घालून त्याचे लाडू बनवून देखील खाऊ शकता. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी दररोज आपल्या आहारामध्ये किमान एक वाटी तरी मखाना खायला पाहिजे. तुम्ही मखान्यांची ड्रायफ्रुट्स घालून खीर देखील करू शकता. मधुमेहींनी जर मखाने खाल्ले तर त्यांची जेवणानंतरची जी साखर लेव्हल असते ती आटोक्यात यायला मदत होते, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
सतत मोबाईल वापरल्यानं होतो 'हा' गंभीर आजार, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा
विसराळूपणा टाळण्यासाठी मखाना लाभदायी
ज्यांना विसराळूपणा येतो किंवा प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते अशा लोकांनी देखील मखाना खायला पाहिजे. यातून त्यांना कॅल्शियम भेटतं आणि ते त्यांना उपयुक्त ठरतं. विद्यार्थ्यांनी देखील मखाण्याचा खूप उपयोग करायला पाहिजे. तुम्हाला जशा पद्धतीने मखान्यांचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने करू शकता. पण प्रत्येक व्यक्तीने किमान दिवसभरामध्ये एक वाटी तरी मखान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे, असे आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती आहार तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)