चटणी म्हणजे जेवणात तोंडी लावायचा पदार्थ. तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असाल. खोबऱ्याची चटणी, कैरीची चटणी, चिंचेची चटणी, आवळ्याची चटणी अशा आंबट चटणी, दुसरं म्हणजे लसूण चटणी, तिळाची चटणी असेही प्रकार पाहायला मिळतात. मग गाजराची चटणी... ती कशी काय बुवा? कशी लागेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चटणी म्हणजे खोबऱ्यासारखी गाजर वाटून करायची का? तर नाही. गाजराची चटणी हा पदार्थ जितका वेगळा तितकीच तो बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. आता गाजराची चटणी कशी बनवायची ते पाहुयात.
advertisement
Recipe Video : मुगाचं वरण तर नेहमीच खाता, आता बनवा ढक्कू; पचायला हलका आणि चवीला जबरदस्त
गाजराची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गाजर किसून घ्या. आता हे किसलेलं गाजर उन्हात वाळवायचे आहेत. तिसऱ्या-चौथ्या दिवसापर्यंत गाजर चांगले वाळता.
आता सुक्या खोबऱ्याचे काप करून घ्या. ते कढईत भाजून घ्या. खोबऱ्याचे काप चांगले भाजले की त्यात वाळलेलं गाजर टाकून भाजून घ्या. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढा. यात लसणीच्या पाकळ्या सोलून टाका. आवडीनुसार तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाजराची चटणी तयार.
आहे की नाही सोपी रेसिपी. मग आता सतत गोड गोड गाजर हलवा खाऊन कंटाळला असाल तर मग आजीने दाखवलेली ही गाजराची चटणी ट्राय करायला हरकत नाही.
Gajar Recipe Video : गाजर हलवा खाऊन खाऊन कंटाळलात, मग आता बनवा गाजराचे गुलाबजामुन
@udarambharnam या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकदा तुम्हीही बनवून पाहा आणि कशी झाली आम्हालाही आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
