जालना शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या रियान कादरी या विद्यार्थ्याने शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या समोर ‘सिट अँड बाईट’ नावाने चहाचं दुकान सुरू केलं आहे. इथे चहाबरोबर दिला जाणारा कप हा गहू, रागी आणि मैदा यापासून तयार केलेला असून चहा घेतल्यानंतर हा कप आपल्याला खाता देखील येईल.
Recipe: मोशन सिकनेसवर रामबाण, सर्दी अन् खोकल्याचं टेन्शन नाही, घरीच बनवा अद्रक कँडी!
advertisement
चहाच्या कपालाही फ्लेवरचा स्वाद
गहू, रागी आणि मैद्यापासून बनवलेला हा चहाचा कप खाण्यासाठी आहे. या कपात अर्धा तासापर्यंत चहा राहू शकतो. 20 रुपयाला एक अशी या चहा आणि कपची किंमत आहे. इलायची, व्हॅनिला आणि चॉकलेट अशा तीन फ्लेवरमध्ये हा कप उपलब्ध आहे. त्याचबरोबर काचेच्या ग्लासमध्ये देखील चहा उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगाला जालनाकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रियान कादरी याने लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
कशी सुचली कल्पना?
शिक्षणाबरोबर आपला काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने मी आणि माझ्या मित्राने हा व्यवसाय सुरू केला. बंगळूरमध्ये आम्ही या पद्धतीचे स्टॉल बरेच पाहिले. त्याच धर्तीवर जालन्यात देखील अशा पद्धतीचा चहा मिळावा अशी कल्पना आम्हाला सुचली. जालना शहरातील नागरिकांचा या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पद्धतीच्या कपामुळे आणि चहामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यास देखील मदत होणार आहे, असे रियान सांगतो.
दरम्यान, प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेतल्यानंतर तो फेकून दिला जातो. फेकलेला प्लास्टिक कप डिस्पोज व्हायला किमान 20 वर्षे लागतात. त्याचबरोबर अशा कपात चहा घेतल्याने कॅन्सरचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. परंतु या पद्धतीच्या कपामध्ये चहा घेतल्यानंतर कॅन्सरचा धोका तर टाळता येईलच, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाला देखील मदत होईल, असं रियान कादरी याने सांगितलं.