1. फराळ बनवताना कोणतेही साहित्य असो, पोहे, रवा, बेसन, खोबरे हे पूर्णपणे कोरडं असावं. फराळ बनविण्याच्या आधी ते हलक्या उन्हात एकदा वाळवून घ्यावं. ओलसर हाताने फराळ बनवू नये, यामुळे बुरशी किंवा ओलसरपणा येतो. तसेच प्रत्येक पदार्थाचे साहित्य प्रमाण देखील महत्त्वाचे आहे. काही साहित्य जास्त झाल्यास पदार्थ लवकर खराब होतात.
advertisement
Diwali Recipe: खमंग अन् खुसखुशीत सांगलीचा चिवडा! पाहा 1kg प्रमाणात अगदी सोपी रेसिपी
2. फराळ बनवण्यासाठी योग्य तेलाची निवड करणे आवश्यक आहे. कोणतेही तेल वापरल्यास पदार्थ लवकर खराब होतात. आधीच एखादा पदार्थ तेलात तळला असेल तर त्याच तेलात पुन्हा काहीही तळू नये. त्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात.
3. तेलाचं तापमान योग्य असणे देखील फराळ बनवताना महत्त्वाचे आहे. फार गरम तेलात तळल्यास पदार्थ पटकन लाल होतात पण आतून कच्चे राहतात. कच्चे असल्याने ते लवकर खराब होतात. मध्यम आचेवर तळल्यास पदार्थ कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतात.
4. त्यानंतर फराळाचा कोणताही पदार्थ तळल्यानंतर तो पूर्णतः थंड करूनच डब्यात भरावा. गरम पदार्थ ठेवले तर वाफेमुळे ओलावा तयार होतो आणि खुसखुशीत पदार्थ नरम होतात. काही पदार्थ लवकर खराब होतात. विशेषतः चकल्या आणि शंकरपाळेसाठी हे महत्त्वाचं आहे.
5. साठवणीसाठी योग्य डबे निवडणे देखील महत्त्वाचे आहे. एअरटाइट स्टील किंवा काचेचे डबे वापरावेत. प्लास्टिकचे डबे टाळा, कारण त्यात वास अडकतो आणि पदार्थाची चव बदलते. डबे ठेवताना त्यात थोडं मीठाचं पाऊच किंवा छोटा हिंगाचा गोळा ठेवला तर ओलावा कमी येतो.
6. साखरेऐवजी गूळ वापरताना विशेष काळजी घ्यावी. गुळाचे पदार्थ जास्त ओलसर असतात, त्यामुळे त्यांना फ्रिजमध्ये ठेवणं योग्य राहते.
7. फराळाचे पदार्थ डब्यात ठेवल्यानंतर त्याला वेळोवेळी चेक करणे देखील गरजेचे आहे. पदार्थ काढताना हात स्वच्छ असावेत ही बाब देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
फराळ बनवताना स्वच्छता महत्त्वाची आहे. योग्य पद्धतीने साठवण आणि थोडी काळजी घेतली, तर फराळ दिवाळीनंतरही तितकाच ताजा आणि स्वादिष्ट राहू शकतो.