परदेशातून मायदेशी ओंकारचा प्रवास
ओंकार जाधवने हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण पूर्ण करून सिंगापूरमध्ये एक वर्ष इंटर्नशिप केली. त्यानंतर लंडनला जाऊन शिक्षण आणि अनुभव दोन्ही घेतले. लंडनमधील एका हॉटेलमध्ये दोन वर्षे मॅनेजर म्हणून काम केलं. पण तरीही परदेशी जीवनात मन रमलं नाही. कोविड काळात परत आल्यावर ओंकारने आपल्या देशातच काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच दहिसरमध्ये 'ओमीज किचन' सुरू केलं. या प्रवासात त्यांच्या पत्नीचीही मोठी साथ होती.
advertisement
Women Success: हातात कला अन् डोळ्यात स्वप्न, मुंबईच्या मनिषानं करून दाखवलं, तुम्हीही कराल कौतुक!
ओमीज किचनची खासियत काय?
आजच्या जमान्यात स्पर्धा खूप आहे, पण ओंकारने "फास्ट फूड आरोग्यदायी आणि घरगुती चवीनं" देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे कोणत्याही पदार्थात फूड कलर किंवा प्रिझर्व्हेटिव्ह वापरण्यात येत नाही. सगळ्या चटण्या आणि सॉसेस घरी बनवल्या जातात. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि चविष्ट अनुभव मिळतो. दहिसर पूर्व स्टेशन पासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर ओमीज किचन आहे.
सुरुवात फक्त 35 रुपयांपासून
ओमीज किचनमध्ये तुम्हाला खमंग आणि स्वादिष्ट शॉवरमाचे विविध प्रकार मिळतात. चिकन शॉवरमा, मॅयो शॉवरमा आणि स्पायसी शॉवरमा हे त्यांच्या खास रेसिपीनुसार तयार करण्यात येतात, जे पूर्णपणे घरगुती आणि फूड कलरविना बनवलेले असतात. बर्गरच्या प्रेमींसाठी येथे व्हेज बर्गर, चिकन बर्गर आणि चीज बर्गर असे पर्याय आहेत. सॉफ्ट बन, ताज्या भाज्या आणि खास सॉस यांच्या संयोजनातून बनलेले हे बर्गर अत्यंत चविष्ट असतात.
गव्हापासून तयार केलेले रोटी रोल्स हा येथील आणखी एक खास पदार्थ आहे. व्हेज, चिकन आणि अंडा अशा विविध प्रकारांमध्ये हे रोल्स मिळतात, जे चव आणि पौष्टिकता दोन्ही जपतात. फ्रँकीच्या विविध चवदार व्हेरिएशन्सदेखील येथे उपलब्ध आहेत. पनीर, चिकन आणि अंड्याची फ्रँकी ही घरच्या स्टाईलने तयार केली जाते, ज्यामध्ये अतिरिक्त तेल न वापरता शिजवलेले मसाले असतात.